PM Modi : वसुंधरा, शिवराज अन् रमणसिंहांचं नावच नाही; पीएम मोदींचाही CM बदलाचा मूड?
PM Modi : उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत भाजपला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळाला आहे. या तिन्ही राज्यांत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याच नावाने मतं मागितली. मोदींच प्रचार, भाजपाची स्ट्र्रटेजी अन् विरोधकांवर प्रहार सारंकाही जुळून आलं. मतदारांनी भाजपाच्या पारड्यात भरभरून मतांचं दान केलं. आता या राज्यात मुख्यमंत्री कोण असेल यावर भाजपात मंथन सुरू झालं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान (Rajasthan CM) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh CM) भाजपने काही वेगळा प्लॅन तयार केलाय का? असा प्रश्न अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर हो असंच मिळताना दिसत आहे. गुरुवारी ज्यावेळी पीएम मोदी संसदीय मंडळाच्या बैठकीला आले त्यावेळी त्यांनी तीन राज्यांतील विजयाचा उल्लेख केला. या विजयाचं श्रेय त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलं आणि सांगितलं की हे टीमवर्क आहे. त्यामुळेच आपल्याला विजय मिळाला आणि यापुढेही अशीच कामगिरी करत राहू, असे मोदी म्हणाले.
New Chief Minister : एमपी, छत्तीसगड राजस्थानचा CM कोण? BJP करणार नवा चमत्कार
मोदींनी आपसल्या भाषणात माजी मु्ख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje), छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह (Raman Singh) आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांचं नावही घेतलं नाही. मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेचाही उल्लेख त्यांनी केला नाही. त्यामुळे आता असे मानले जात आहे की माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्याला संधी मिळेल. या बैठकीस उपस्थित असलेल्या एका खासदारानेही सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हा विजय मिळाल्याचे सांगितले.
पीएम मोदी म्हणाले, पार्टी स्थापन झाल्यापासून यात योगदान देणाऱ्या नेत्यांमुळेच आज आपण याठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. त्यावेळपासूनच सामूहिक प्रयत्नांची परंपरा सुरू झाली. यावेळीही टीम वर्क मुळेच यश मिळालं. देशातील सर्व खासदारांनी विकसित भारत यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन मोदींनी यावेळी केले.
MP Election : ‘चिप असलेली मशीन ‘हॅक’ होऊ शकते; दिग्विजय सिंहांचा ‘EVM’ वर गंभीर आरोप
25 डिसेंबरपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. भाजपा सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा स्ट्राइक रेट 58 टक्के आहे तर काँग्रेसचा स्ट्राइक रेट फक्त 17 टक्के आहे. आपल्या भाषणात पीएम मोदींनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही यावरून हेच स्पष्ट होत आह की तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. याआधी भाजपाने उत्तराखंड, गुजरात आणि हरियाणा या राज्यांत वेगळा फॉर्म्युला लागू केला होता.