Rajasthan Result 2023 : इम्रान खान यांचा पराभव करून महंत बालकनाथ विजयी; आता CM पदाच्या शर्यतीत

  • Written By: Published:
Rajasthan Result 2023 : इम्रान खान यांचा पराभव करून महंत बालकनाथ विजयी; आता CM पदाच्या शर्यतीत

Rajasthan Result 2023 : राजस्थानच्या तिजार विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार बाबा बालकनाथ (Baba Balaknath) विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान (Imran Khan) यांचा पराभव केला. त्याचबरोबर विजयानंतर बाबा बालकनाथ यांनी जनतेचे आभार मानले. बालकनाथ यांनी काँग्रेसच्या इम्रान खान यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. बालकनाथ यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘आता लोकसभेतही भाजपच’; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास 

बालकनाथ यांना 110209 मते मिळाली

तिजारा विधानसभा जागेवर झालेल्या निवडणुकीत मंहत बालकनाथ यांना 110209 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांना 104036 मते मिळाली. याशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर आझाद पक्षाच्या कांशीराम यांना 8054 मते मिळाली. तर बसपाचे उमेदवार हेमकरन यांना फक्त 567 इतकी मते मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाबा बालकनाथ यांनी अलवरमधून काँग्रेसच्या भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला. या जागेवर त्यांचे उमेदवार इम्रान खान मोठा विजय नोंदवतील, अशी काँग्रेसला पूर्ण आशा होती. मात्र भाजपचे उमेदवार बालकनाथ यांनी इम्रान खान यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

बालकनाथ गेहलोतानंतर सर्वात आवडते नेते

आजतक अॅक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांची पहिली पसंती मुख्यमंत्री अशोक गेहलोत होते. गेहलोत यांना सर्वेक्षणात 32 टक्के लोकांनी पसंती दिली. तर महंत बालकनाथ योगी यांना 10 टक्के लोकांची पसंती होती. सर्वेक्षणात 10 टक्के लोक बालकनाथ योगी यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महंत बाबा बालकनाथ योगी यांनी अलवरमध्ये काँग्रेसचे सर्वात मोठे नेते भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता.

आता समजलं का कोण पनौती अन् कोण चुनोती? निकालानंतर शेलारांचा टोमणा 

भाजपच्या फायरब्रँड नेत्यांमध्ये बालकनाथ यांचा समावेश
महंत बालकनाथ योगी हे राजस्थानमधील अलवरचे खासदार आहेत. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सीएम योगी यांच्यासारखे कपडे घालणारे महंत बालकनाथ योगी यांना राजस्थानचे ‘योगी’ देखील म्हटले जाते. तिजारा विधानसभा मतदारसंघातून महंत बालकनाथ योगी भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. महंत बालकनाथ योगी यांचा जन्म 16 एप्रिल 1984 रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात झाला. उर्मिला देवी-सुभाष यादव अशी त्याच्या आई-वडिलांची नावे आहेत.

बालवयातच वयातच संन्यास घेतला

बाबा बालकनाथ यांनी वयाच्या 6 व्या वर्षी संन्यास घेतला आणि घर सोडले. त्यांनी आश्रमात राहून शिक्षण घेऊ लागले. हिंदुत्वाशी संबंधित अजेंड्यावर त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते अनेकदा चर्चेत राहतात. ते सीएम योगीसारखे कपडे देखील घालतात. ते हे मस्तनाथ मठाचे महंत आहेत. बाबा बालकनाथ हे ओबीसी प्रवर्गातून येतात. पक्षाकडून त्यांना राज्यात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिले – वीरभूमी राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाबद्दल सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे आणि राजस्थानच्या आदरणीय जनतेचे हार्दिक अभिनंदन! पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक विजय मिळाला. हा विजय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर, लोककल्याणकारी दृष्टीकोन आणि धोरणांवरील राजस्थानच्या नागरिकांच्या अतूट विश्वासाचे आणि सर्वांगीण विकासासाठीच्या त्यांच्या निर्धाराचे प्रतीक आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube