आता समजलं का कोण पनौती अन् कोण चुनोती? निकालानंतर शेलारांचा टोमणा

  • Written By: Published:
आता समजलं का कोण पनौती अन् कोण चुनोती? निकालानंतर शेलारांचा टोमणा

Election 2023 : निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल आता समोर आलेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीनही राज्यात राज्यात भाजप आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसचा पराभव केला आहे. मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. राजस्थानमध्येही भाजपने (BJP) मोठी आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहेत, मात्र सध्या भाजप आघाडीवर आहे. आता ही तीन राज्ये भाजपकडे जाणार हे स्पष्ट झालं. यावर आता भाजप नेते आशिष शेला (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिला.

Assembly Election 2023 : केसीआरची ऑफर नाकारली; काँग्रेसला जिंकून देण्यामागे डोके कुणाचे ? 

आज माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, विरोधी नेते हे द्वेषाच्या राजकारणाचे बळी ठरले. विरोधकांनी कधी विकासाकडे पाहिलं नाही. राज्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्या कधी जाणून घेतल्या नाहीत. त्या पूर्ण करण्याची भूमिका घेतली नाही. ते केवळ मोदींचा द्वेषच करत राहिले. त्याचाच फटका विरोधकांना बसला. तेलंगणात तर भाजपची चार पट वाढ झाली. जनतेनं आम्हाला कौल दिला, मतदारांचे आभार. आम्ही त्यांचा विश्वास सार्थकी लावू, असं शेलार म्हणाले.

छत्तीसगडमध्ये सत्तांतर; काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? 

ते म्हणाले, तीन राज्यात भाजपला यश आलं. एक्सिट पोल काय सांगत होत ? पण स्थिती काय ? एक्सिट पोल बाजूला गेले आणि काँग्रेसवाले तोंडावर पडले, असं ते म्हणाले. ज्या वेळी केद्रांत सरकार आले तेव्हा मोदी म्हणाले की माझं सरकार गरिबांना समर्थन आहे. कॉंग्रेसने केवळ गरिबी हटावोच्या घोषणा दिल्या. पण, गरीबी हटले नाही. मोदींना गरिबी हटावोच्या अभियान राबवून गरीबी दूर केली. मोफत लस पुरवणी मोदींनी केली. कोणी भुकेला रहाता कामा नये म्हणून ८० कोटी लोकांपर्यंत अन्नधान्य पोहचवले…रोजगार निर्मीती केली, असंख्य योजना केल्या. विरोधकांनी फक्त टीका केल्या पण आम्ही काम करत राहिलो. या देशात द्वेषाचं काम इंडिया आघाडी करत होती.

राहुल गांधींवरही टीका केली. मोदीजींना पनोती म्हणाले. आता समजले का कोण पनोती आणि चुनोती कोण ? ज्यांनी जगात भारताचं नाव उंच केलं, त्यांना अपमानित केलं. जनतेने तुम्हांला जमिनीवर आपटले, असं शेलार म्हणाले.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून उभा राहून एक नेता नेहमी भाषण करतो. मी मर्दांचा पक्ष आहे, माझ्यासमोर सारे मर्द आहेत. मी तर नेहमी म्हणतो, आमच्यात शंका नाही. तुम्ही का दरवेळेला सांगत आहात. एक भाषण काढलं की 15 वेळा मर्द-मर्द… आता तरी कळलं का मर्द आणि मर्दांगी कशाला म्हणतात. या तीन राज्यांतील निवडणुकीच्या निकालावर बघा. उबाठाच्या लोकांना सांगू इच्छितो की, गल्लीमध्ये ओरडलं म्हणजे, सुर्य निघत नाही, असं होत नाही. सुर्यावर थुंकल्यानं सुर्याचा अपमान होत नहाी. तुमच्याच तोंडावर थुंकी पडते, म्हणून आजचा निकाल हा तुम्हाला चपराक आहे, असं शेलार म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube