MP Election : ‘चिप असलेली मशीन ‘हॅक’ होऊ शकते’; दिग्विजय सिंहांचा ‘EVM’वर गंभीर आरोप

MP Election : ‘चिप असलेली मशीन ‘हॅक’ होऊ शकते’; दिग्विजय सिंहांचा ‘EVM’वर गंभीर आरोप

MP Election 2023  : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल (MP Election 2023) लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Election Results 2023) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. भाजपाच्या या प्रचंड विजयानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे. चिप असलेली कोणतीही मशीन हॅक होऊ शकते. मी ईव्हीएम मशीन वापरून मतदान घेण्याला विरोध करत आहे, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Congress leader Digvijay Singh Serious Allegation on EVM Machine in Madhya Pradesh Election)

Madhya Pradesh Election 2023 : सत्तास्थापनेत मायावती ठरणार ‘किंगमेकर’, ‘सायलेंट’ आघाडी कोणावर पडणार भारी ?

आपण भारतीय लोकशाहीला व्यावसायिक हॅकर्सच्या ताब्यात देऊ शकतो का, हा मुलभूत प्रश्न आहे ज्याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तुम्ही कृपया आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण कराल का, असा प्रश्न दिग्विजय सिंह यांनी आपल्या पोस्टद्वारे विचारला आहे. चिप असणारी कोणतीही मशीन हॅक होऊ शकते. मी 2003 पासून ईव्हीएमला विरोध करत आहे. आपण आपल्या लोकशाहीचं नियंत्रण व्यावसायिक हॅकर्सच्या हातात देणार आहोत का, हा प्रश्न सर्व राजकीय पक्षांनी विचारात घेतला पाहिजे.

दिग्विजय सिंह यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोस्टल बॅलटवर मिळालेल्या मतांनुसार काँग्रेस पक्षाला 199 मतदारसंघांत आघाडी आहे. मात्र यातील बहुतांश मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मिळालेल्या मतांमध्ये काँग्रेस मागे आहे. या दोन्ही माध्यमांतून मिळालेल्या मतांवेळी वोटिंग पॅटर्न इतका कसा बदलला, असा सवाल उपस्थित करत व्यवस्था जिंकली की जनता हरते असे काँग्रेस नेते दिग्वजिय सिंह यांनी म्हटले आहे.

कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी 

मध्य प्रदेशात (MP Election 2023) काँग्रेसच्या पराभवानंतर हायकमांड अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. हायकमांडने कमलनाथ (Kamalnath) यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेशात दारुण पराभव झाल्यानंतर हायकमांड कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी भाजपच्या शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांच्यासारखी सक्रियता दाखवली नाही, असे हायकमांडला वाटते. काँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यांना काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते पण निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube