Madhya Pradesh Election 2023 : सत्तास्थापनेत मायावती ठरणार ‘किंगमेकर’, ‘सायलेंट’ आघाडी कोणावर पडणार भारी ?

Madhya Pradesh Election 2023 : सत्तास्थापनेत मायावती ठरणार ‘किंगमेकर’, ‘सायलेंट’ आघाडी कोणावर पडणार भारी ?

Madhya Pradesh Election 2023 : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh Election 2023 ) जसं जशी निवडणुकांची तारिख जवळ येत आहे. तसं तसे राजकीय समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. कारण राज्यातील मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात होणार आहे तरी आणखी एक पक्ष याठिकाणी किंगमेकर ठरू शकतो कोणता आहे हा पक्ष? तसेच तो कसा किंगमेकर ठरणार पाहूयात…

Sanjay Raut : मराठा समाजाला आरक्षण द्यावच लागेल, नाहीतर.. राऊतांचा रोखठोक इशारा

देशात आगामी लोकसभा निवडणुंकापुर्वी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहे. त्यात मध्य प्रदेशात निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. त्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यासह राजकीय विश्लेषकांचे लक्ष बहु समाज पक्षाच्या मायावतींकडे लागले आहे. याचं कारण ही तसंच आहे. पाहूयात सविस्तर…

Jaybhim Panther: ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष नवा मराठी सिनेमा लवकरच

निवडणुकीत बसपला मिळणाऱ्या जागांवर राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकते. 2018 मध्ये बहुजन समाज पक्षामुळे काँग्रेसला अनेक जागा गमवाव्या लागल्या. निवडणुकीत एकूण 230 जागांपैकी 68 जागांवर बसपचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी होते. भाजपला 128 तर कॉंग्रेसला 98 जागा मिळाल्या होत्या.

तर यावेळी देखील बसपाने मध्य प्रदेशातील गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत (जीजीपी) आघाडी केली आहे. जीजीपीनेही मागच्या निवडणुकीत बसपप्रमाणेच अनेक ठिकाणी निकाल पलटवून टाकले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी काय करावे, याची रणनीती आखली जात आहे.

‘जीजीपी’ मुळे २०१८ मध्ये असा बसला फटका

टिमरनी : काँग्रेसचा २,२१३ मतांनी पराभव झाला. इथे जीजीपीला साडेपाच हजार मते मिळाली होती.
बिजजपूर : कॉंग्रेस उमेदवार २,८४० मतांनी पराभूत झाला होता. इथे बसप उमेदवाराला ३७ हजारांहून अधिक मते मिळाली.

मते खाल्ली आणि गणित बिघडले

अटेर : काँग्रेसच्या उमेदवाराचा ५ हजार मतांनी पराभव झाला. बसपाला इथे १६ हजाराहून अधिक मते मिळाली होती. कोलारस : काँग्रेसचा उमेदवार अवघ्या ७२० मतांनी जिंकून आला. बसपच्या उमेदवाराला ७ हजार मते मिळाली होती.
टिकमगड : काँग्रेसने ४,१७५ मतांनी गमावली. इथेही बसपने १० हजारांहून अधिक मते खाल्ली होती.

यावेळी बसपने १७८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर, जीजीपीच्या वाट्याला ५२ जागा आल्या आहेत. तर या दोन पक्षांचं एकत्र येणं हे राज्याच्या राजकीय समीकरणाच्या दृष्टीकोनातून ही आघाडी सर्वात मोठी असून ‘सायलेंट’ आघाडी म्हणूनही त्यास बोलले जात आहे.गेल्या वेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता. ‘इंडिया’ आघाडीच्या निमित्ताने समाजवादी पार्टीचीही चर्चा होत आहे. मात्र, सपापेक्षा जास्त वजन या आघाडीला प्राप्त झाले आहे.गेल्या निवडणुकीत बसपला ५.१ टक्के मते मिळाली होती. तर केवळ १.३० टक्के मतदान सपाला झाले होते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने ही ‘सायलेंट’ आघाडी कोणावर भारी ? पडणार हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube