कोरोनाकाळात करोडोंना साक्षर करणारे बायजू रवींद्रन झाले बेघर; कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवली संपत्ती

कोरोनाकाळात करोडोंना साक्षर करणारे बायजू रवींद्रन झाले बेघर; कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवली संपत्ती

Byju’s Loan Case : देशातील सर्वात मोठी अॅडटेक स्टार्टअप कंपनी बायजूचं आर्थिक संकट (Byju’s Loan Case) आता कंपनीचे फाउंडर बायजू रवींद्रन यांच्या घरापर्यंत आलं आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार देण्यासाठी आता त्यांनी स्वतःच घर गहाण ठेवलं आहे. इतकंच नाही तर आपल्या परिवारातील सदस्यांच्या नावावर जी संपत्ती आहे ती सुद्धा गहाण ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बायजूला आपल्या Think and Learn Pvt या कंपनीतील 15 हजार कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत.

एकवेळ अशी होती की बायजू कंपनी देशातील सर्वात श्रीमंत स्टार्टअप कंपनी होती. कंपनीचं यश डोळे दिपवणारं असच होतं. पण, काही काळातच कंपनीला आर्थि संकटाचा सामना करावा लागला. या संकटात कंपनी अधिकच रुतत गेली. आता परिस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी रवींद्रन बायजू यांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं आहे. पैसे उभे करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची संपत्तीही पणाला लागली आहे.

ब्लूमबर्गच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगाार देण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे आता स्वतःचे घर आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली संपत्ती गहाण ठेऊन पैसे उभे करण्याचा मार्ग रवींद्रन यांनी स्वीकारला आहे. रवींद्रन यांच्या कुटुंबाच्या नावावर बंगळुरूत दोन घरं आहेत. यासह एक बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. त्यांनी त्यांची ही संपत्ती 1.2 कोटी डॉलर म्हणजेच 100 कोटी रुपये उभे करण्यासाठी गहाण ठेवली आहे.

कधी काळी बायजू यांच्याकडे 5 अब्ज डॉलर्स (41 हजार 715 कोटी रुपये) होती. त्यांनी स्थानिक पातळीवर 40 कोटी डॉलरचे कर्ज घेतले आहे. कंपनीने सगळे शेअर्स आधीच गहाण ठेवले आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने अनेक प्रयत्न केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विदेशी मुद्रा व्यवहार कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन केले म्हणून कंपनीची चौकशीही झाली आहे. जवळपास 9 हजार कोटी रुपयांच्या हेराफेरीचे हे प्रकरण आहे. यामुळे कंपनीचे संकट सातत्याने वाढत चालले आहे.

कंपनीच्या कामकाजावर गुंतवणूकदारांनीही नाराजी व्यक्त केली होती. संचालक मंडळातील सदस्यांनीही आक्षेप नोंदवला आहे. कंपनीने मागील काही वर्षात ऑडिटही केलेले नाही. 2020-21 या वर्षातील आर्थिक ताळेबंद पत्रकही कंपनीने तयार केले नसल्याची माहिती समोर आली आहे. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांत कंपनीला किती यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube