भारताच्या मित्र देशात नोकरीची संधी; इस्त्रायलमध्ये ‘या’ जॉबसाठी आताच करा अर्ज

Job in Israel : अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी इस्त्रायल देशात “गृहआधारित आरोग्य सेवा कर्मचारी” म्हणून काम (Job in Israel) करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार उमेदवारांना ही संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे.
या नोकरीसाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कौशल्य आणि अनुभव असणे महत्त्वाचे आहे. यासाठी भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि किमान 990 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, नर्सिंग, फिजिओथेरपी, किंवा नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
जीडीए (GDA), एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing), किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग (Post B.Sc. Nursing) याशिवाय, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. या नोकरीसाठी दरमहा 1 लाख 61 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.
एआयमुळे रोजगार संकटात! अनसेफ अन् सेफ नोकऱ्यांची यादी मिळाली; मायक्रोसॉफ्टचा अहवाल
निवड प्रक्रिया आणि सुविधा
इस्त्रायलमध्ये नोकरी मिळवण्यासाठीची निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच पार पडेल. यासाठी नियुक्ती, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल. तसेच इस्त्राईलमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय विमा, राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. या संधीबद्दल अधिक माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे असे पंतम यांनी सांगितले.