दीड हजार विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार; पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचा पुढाकार

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील 1,722 विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत 1,593 नोकऱ्या मिळाल्या आहेत. येत्या सहा महिन्यांत आणखी रोजगार मेळावे होणार आहेत अशी माहिती पीसीईटी, नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.
विद्यार्थ्यांची निवड नामांकित आयटी कंपन्यात झाली आहे. काही कंपन्या व त्यांनी दिलेल्या रोजगारांची संख्या पुढीलप्रमाणे : कॅपजेमिनी (356), ॲक्सेंचर (243), टेक महिंद्रा (128), एलटीआय माईंडट्री (77), केपीआयटी (65), कॉग्निझंट (52) इत्यादी. रोजगाराच्या संधी दिलेल्या काही आयटी प्रॉडक्ट कंपन्या व त्यांनी दिलेले वार्षिक पगार पुढीलप्रमाणे : लिंक्डइन (60 लाख), अॅमेझॉन (47.88 लाख), कॉमव्हॉल्ट सिस्टिम्स (33 लाख), लेमा (30 लाख) इत्यादी.
रोजगाराच्या संधी दिलेल्या कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमध्ये फिलिप्स, महिंद्रा अँड महिंद्रा, डसॉल्ट सिस्टिम्स, टाटा टेक्नॉलॉजीज, ऍटलस कॉप्को, गोदरेज, मिंडा, अल्फा लावल यांचा समावेश आहे. पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट सेल दर वर्षी विद्यार्थ्यांना सुमारे 350 नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी देते. पीसीईटीचे आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज 61 लाख रुपये (उबेर) इतके आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, ट्रस्टी हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी, डॉ. जहागीरदार, डॉ. सपली, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पीसीईटी, नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दीपक पवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. हीना शर्मा प्रा. डेन्झेटा लोबो, मंगेश काळभोर सर्व विभागातील ट्रेनिंग प्लेसमेंटचे शिक्षक प्रतिनिधी व दोनशेहून अधिक विद्यार्थी प्रतिनिधी यांनी योगदान दिले.
गुडन्यूज! मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत मोठा बदल; पात्र प्रकल्पाच्या किंमतीत 50 लाखांची वाढ