एआयमुळे रोजगार संकटात! अनसेफ अन् सेफ नोकऱ्यांची यादी मिळाली; मायक्रोसॉफ्टचा अहवाल

Artificial Intelligence : एआयमुळे (Artificial Intelligence) रोजगारावर परिणाम झाला ही गोष्ट नाकारता येणार नाही. या तंत्रज्ञानामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत आणखीही रोजगारांवर संकट निर्माण झालं आहे. मायक्रोसॉफ्टच्या अलीकडच्या अहवालात एक मोठा दावा करण्यात आला आहे. या अहवालात 40 अशा नोकऱ्यांची यादी देण्यात आली आहे ज्यावर एआयचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. याचबरोबर आणखी 40 नोकऱ्यांची यादी देण्यात आली आहे ज्यात या नोकऱ्या एयआयपासून सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्टचा हा अभ्यास दोन लाखांहून अधिक मायक्रोसॉफ्ट बिंग कोपायलट इंटरॅक्शनच्या विश्लेषणावर आधारीत आहे. या अहवालाने नोकऱ्यांची यादी दिली असली तरी एआयमुळे भविष्यात वाढलेल्या आव्हानांचा विचार करण्याचेही संकेत दिले आहेत. एआयमुळे नेमक्या कोणत्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत याची माहिती घेऊ या.
मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार इंटरप्रेटर आणि ट्रान्सलेटर, इतिहासकार, पॅसेंजर अटेंडेंट्स, सर्विस सेल्स रिप्रेजेंटेटिव्स, रायटर आणि ऑथर्स, कस्टमर सर्विस रिप्रेजेंटेटिव्हस, सीएनसी टूल प्रोग्रामर्स, टेलिफोन ऑपरेटर्स, तिकीट एजंट आणि ट्रॅव्हल क्लर्क्स, ब्रॉडकास्ट अनाउंसर आणि रेडिओ DJs, ब्रोकरेज क्लर्क्स, फार्म आणि होम मॅनेजमेंट एज्युकेटर्स, टेलिमार्केटर्स, कंसीयर्स, पॉलिटिकल सायन्स, न्यूज अॅनालिस्टस आणि पत्रकार, मॅथमेटिशियन, टेक्निकल रायटर्स, प्रूफरीडर आणि कॉपी मार्कर्स, होस्ट आणि होस्टेजेस, एडिटर्स, बिजनेस टिचर्स, पब्लिक रिलेशन स्पेशालिस्टस,
डेमोंस्ट्रेटर आणि प्रोडक्ट प्रमोटर्स, अॅडव्हर्टायजिंग सेल्स एजंट्स, न्यू अकाउंट क्लर्क्स, स्टॅटिस्टिकल असिस्टेंट्स, काउंटर आणि रेंटल क्लर्क्स, डेटा सायंटिस्टस, पर्सनल फायनान्शियल सल्लागार, आर्काइविस्टस, इकॉनॉमिक टिचर्स, वेब डेव्हलपर्स, मॅनेजमेंट अॅनालिस्टस, जियोग्राफर्स, मॉडल्स, मार्केट रिसर्च अॅनालिस्टस, पब्लिक सेफ्टी टेलिकम्युनिकेटर्स, स्विचबोर्ड ऑपरेटर्स आणि लायब्ररी सायन्स टिचर्स या क्षेत्रातील रोजगार धोक्यात असल्याचे या अहलावालात म्हटले आहे.
AI नोकरी घेणार नाही वाचवणार! ‘या’ 9 सेक्टर्सना जास्त धोका, स्वतः अपस्किल व्हा अन् जॉब सेफ करा
या यादीवर नजर टाकली तर लक्षात येतं की ज्या क्षेत्रात चॅटजीपीटी, आणि गुगल जेमिनी यांचा वापर चांगल्या प्रकारे होते त्याच क्षेत्रातील रोजगार धोक्यात आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एआय साक्षर आणि क्रिएटिविटी विकसित करण्याची आवश्यकता आहे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या क्षेत्रातील रोजगार तु्र्तास सेफ
ड्रेज ऑपरेटर्स, ब्रिज आणि लॉक टेंडर्स, वॉटर ट्रिटमेंट प्लांट ऑपरेटर्स, फाउंड्री मोल्ड आणि कोर मेकर्स, रेल्वे ट्रॅक लेइंग आणि मेन्टेनन्स इक्विपमेंट ऑपरेटर्स, पाइल ड्रायव्हिंग ऑपरेटर, फ्लोर सेंडर्स आणि फिनिशर्स, ऑर्डरलीज, मोटरबोट ऑपरेटर, लॉगिंग इक्विपमेंट ऑपरेटर्स, पेविंग, सरफेसिंग आणि टेम्पिंग इक्विपमेंट ऑपरेटर, मेड्स आणि हाउसकिपिंग क्लीनर्स, राउस्ट अबाउट्स, ऑइल आणि गॅस, रुफर्स, गॅस कंप्रेसर आणि गॅस पंपिंग स्टेशन ऑपरेटर्स, हेल्पर्स, टायर बिल्डर्स, सर्जिकल असिस्टेंट्स, मसाज थेरपिस्ट, ऑप्थाल्मिक मेडिकल टेक्निशियन्स, इंडस्ट्रीयल ट्रक आणि ट्रॅक्टर ऑपरेटर्स,
फायर फायटर्स सुपरवाजयर, सिमेंट मेसन्स आणि काँक्रीट फिनिशर्स, डिशवॉशर्स, मशीन फीडर्स आणि ऑफबियर्स, पॅकेजिंग आणि फिलींग मशीन ऑपरेटर्स, मेडिकल इक्विपमेंट्स प्रिपेरर्स, हायवे मेन्टेनन्स वर्कर्स, हेल्पर्स प्रोडक्शन वर्कर्स, प्रोस्थोडॉन्टिस्टस, टायर रिपेअर्स आणि चेंजर्स, शिप इंजिनिअर्स, ऑटोमोटिव्ह ग्लास इंस्टॉलर्स आणि रिपेअर्स, ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन्स, प्लांट आणि सिस्टम ऑपरेटर्स, एबाल्मर्स, हेल्पर्स पेंटर्स प्लास्टर्स, हेजर्ड्स मटेरियल रिमूवल वर्कर्स, नर्सिंग असिस्टेंट्स, फ्लेबोटोमिस्टस या क्षेत्रातील रोजगार सध्या तरी सुरक्षित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
काय सांगता! ब्रिटनचे माजी पंतप्रधान करताहेत नोकरी; खासदार असतानाच घेतला निर्णय