Microsoft Server Down: मायक्रोसॉफ्ट डाऊन होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, नेटकरी उडवताय खिल्ली!

Microsoft Server Down: मायक्रोसॉफ्ट डाऊन होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, नेटकरी उडवताय खिल्ली!

Microsoft Faces Global Outage : जगभरात लाखो लोक मायक्रोसॉफ्टचा वापर करतात. (Microsoft Server Down) पण शुक्रवारी अचानक मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाला. मायक्रोसॉफ्टचा (Microsoft Server) वापर करणाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Global Outage) यामुळे अनेक विमानसेवा देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच अनेक बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. एवढंच नव्हे तर मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका लंडन शेअर मार्केटला बसला आहे.


नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण 12.30 वाजेच्या दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाला. अनेक युजर्सला ब्लू स्क्रीनची समस्या जाणवली. त्यानंतर लगेच काही डिव्हाईस बंद पडले. यानंतर आता कंपनीने याबद्दल एक संदेश देण्यात आला आहे. तुमच्या डिव्हाईसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो रिस्टार्ट करण्याची गरज आहे. आम्ही हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. तो दुरुस्त झाल्यानंतर तुमचा डिव्हाईस रिस्टार्ट करता येणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने नमूद केले आहे.


भारतात विमान कंपन्यांना दणका

भारतात हवाई सेवा देणाऱ्या तीन विमान कंपन्यांना याचा दणका बसला आहे. इंडिगो, अकासा आणि स्पाइसजेटला जगातील अनेक विमानतळांवर चेक इन प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागला आहे. यामुळे मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह अन्य विमानतळांवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अकासा एअर कंपनीने प्रवाशांना सांगितले आहे की कंपनीकडून विमानतळांवर मॅन्युअली चेक इन आणि बोर्डिंग सुविधा दिली जात आहे.

चेक इन करण्यासाठी या कंपन्यांकडून ज्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे विमानांची उड्डाणे प्रभावित झाली आहेत. या तिन्ही कंपन्यांकडून GoNow चेक इन सिस्टीमचा वापर केला जातो. यामध्ये आज सकाळी 10.45 वाजता तांत्रिक अडचण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. या अडचणी दूर करण्यासाठी विमान कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट मिळून काम करत आहेत.


ऑस्ट्रेलियात सुपर मार्केट ठप्प, विमान उड्डाणे बंद

ऑस्ट्रेलियालाही मायक्रोसॉफ्ट क्रॅशचा जबर फटका बसला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्याने एबीसी न्यूज 24 न्यूज चॅनलचे पॅकेजचे चालवण्यात अडचणी येत आहेत. या संकटाचा परिणान वुलवर्थ सुपरमार्केटवरही झाला आहे. येथे चेक आऊट सिस्टिम क्रॅश झाली आहे. पोलीस सिस्टीमनेही काम करणे बंद केले आहे. मेलबर्न विमानतळावरही परिणाम झाला आहे. येथे चेक इन प्रक्रियेतही बरेच अडथळे येत आहेत. वर्जिन ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे की या अडथळ्यांमुळे विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि आगमन काही काळासाठी थांबवण्यात आले आहे.

फक्त लॅपटॉप नाही, बँकिंग, विमान, रेल्वे अन् स्टॉक मार्केटही ठप्प; ‘मायक्रोसॉफ्ट क्रॅश’ने जग हैराण

मायक्रोसॉफ्ट डाऊन होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर

 

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube