फक्त लॅपटॉप नाही, बँकिंग, विमान, रेल्वे अन् स्टॉक मार्केटही ठप्प; ‘मायक्रोसॉफ्ट क्रॅश’ने जग हैराण

फक्त लॅपटॉप नाही, बँकिंग, विमान, रेल्वे अन् स्टॉक मार्केटही ठप्प; ‘मायक्रोसॉफ्ट क्रॅश’ने जग हैराण

Microsoft Window Outage : आजचा दिवस इंटरनेट जगतात खळबळ उडवणारा ठरलाय. मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये (Microsoft Window Outage) तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने जगभरात बँकिंग सेवांपासून विमान सेवांपर्यंत अनेक महत्वाच्या कामांना फटका बसला आहे. जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोज यूजर्सच्या डिव्हाईसवर निळी स्क्रिन दिसत असून त्यावर एरर असे शब्द दिसत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे सुपरमार्केट्स, बँकिंग सेवा, स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत तीन विमान कंपन्यांना सर्वच विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे. या प्रकाराचा फटका भारतालाही बसला असून देशात अनेक ठिकाणी विमानसेवा ठप्प झाली आहे.

मायक्रोसॉफ्ट विंडोज जगभरात डाऊन; संगणक आणि लॅपटॉप पडतोय बंद, विमानसेवाही थांबवली

या तांत्रिक अडचणींचा फटका जगातील मिडिया हाऊसना बसला आहे. येथील कामकाज ठप्प झाले आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील आपत्कालीन सेवा बंद झाली आहे. ब्रिटेनमध्ये वृत्तवाहिनीला ऑफ एअर करावे लागले. एक्सवर लोकांनी मायक्रोसॉफ्ट क्रॅशची माहिती दिली आहे. जगभरातील महत्वाचे व्यवहार आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. या तांत्रिक अडचणीचे कारण अजून समोर आलेले नाही. याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या एकाच गोष्टीमुळे जगभरात काय परिणाम झाला आहे याची थोडक्यात माहिती घेऊ या..

भारतात विमान कंपन्यांना दणका

भारतात हवाई सेवा देणाऱ्या तीन विमान कंपन्यांना याचा दणका बसला आहे. इंडिगो, अकासा आणि स्पाइसजेटला जगातील अनेक विमानतळांवर चेक इन प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागला आहे. यामुळे मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह अन्य विमानतळांवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अकासा एअर कंपनीने प्रवाशांना सांगितले आहे की कंपनीकडून विमानतळांवर मॅन्युअली चेक इन आणि बोर्डिंग सुविधा दिली जात आहे.

चेक इन करण्यासाठी या कंपन्यांकडून ज्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे विमानांची उड्डाणे प्रभावित झाली आहेत. या तिन्ही कंपन्यांकडून GoNow चेक इन सिस्टीमचा वापर केला जातो. यामध्ये आज सकाळी 10.45 वाजता तांत्रिक अडचण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. या अडचणी दूर करण्यासाठी विमान कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट मिळून काम करत आहेत.

10 लाखांपेक्षा कमी किंमत, फर्स्ट क्लास फीचर्स अन् शानदार मायलेज, ‘ह्या’ कार्स एकदा पहाच

ऑस्ट्रेलियात सुपर मार्केट ठप्प, विमान उड्डाणे बंद

ऑस्ट्रेलियालाही मायक्रोसॉफ्ट क्रॅशचा जबर फटका बसला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्याने एबीसी न्यूज 24 न्यूज चॅनलचे पॅकेजचे चालवण्यात अडचणी येत आहेत. या संकटाचा परिणान वुलवर्थ सुपरमार्केटवरही झाला आहे. येथे चेक आऊट सिस्टिम क्रॅश झाली आहे. पोलीस सिस्टीमनेही काम करणे बंद केले आहे. मेलबर्न विमानतळावरही परिणाम झाला आहे. येथे चेक इन प्रक्रियेतही बरेच अडथळे येत आहेत. वर्जिन ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे की या अडथळ्यांमुळे विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि आगमन काही काळासाठी थांबवण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये रेल्वे ठप्प, जर्मनीत विमान प्रवासी हैराण

युरोपमधील रायन एअर नुसार नेटवर्कमध्ये अडचणी आल्याने विमान उड्डाणे प्रभावित झाली आहेत. ब्रिटेनमध्ये रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. रेल्वेच्या कामकाजात अडचणी येणार असल्याच्या सूचना रेल्वे कंपन्यांनी प्रवाशांना दिल्या आहेत. लंडन स्टॉक एक्सचेंजलाही या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ब्रिटन शेजारील जर्मनीत विमानतळांवर चेक इन प्रक्रियेत विलंब होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या