Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा
Team India Australia Tour : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ( Team India Australia Tour ) यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची अखेर घोषणा झाली आहे. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. मात्र या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या या कसोटीमध्ये चार ऐवजी पाच सामने खेळले जाणार आहे.
राज ठाकरे यांच्यामार्फत शिंदेंना संपविण्याचा डाव, कोणी आखलाय?
दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या घोषणेनंतर कसोटी मालिकांमध्ये 32 वर्षानंतर असं होणार आहे की दोन देशांमध्ये चार ऐवजी पाच सामने खेळले जाते ऑस्ट्रेलिया मध्ये पाच सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेतील इतर सामने हे ॲडलेड ब्रिजबेन मेलबर्न आणि सिडनी या ठिकाणी खेळले जाण्याचं सांगण्यात आलं आहे. या मालिकेची घोषणा झाली असली तरी देखील अद्याप अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
तर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील होणारा हा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सामना 1991-92 नंतर पहिल्यांदाच होत आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4-0 अशा फरकाने पराभव केला होता. मात्र गेल्या चार कसोटी मालिकेत टीम इंडियानं वर्चस्व राखला असून त्यांनी चारही मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
नुकताच क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी न्युझीलँडवर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा पराभव यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंड टीम आता तिसऱ्या स्थानावर आली आहे. या अगोदर भारताने इंग्लंडवर विजय मिळवत न्यूझीलंडला दुसऱ्यास्थानावर ढकलले होते. तर आता ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये न्युझीलँडचा पराभव केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये न्युझीलँड तिसऱ्या स्थानावर गेले आहे.