काय सांगता, क्रिकेटमध्ये होणार चक्क 73 नवीन बदल; जाणून घ्या कधी आणि कोणते नियम लागू होणार

MCC New Cricket Rules : क्रिकेटच्या नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटला अधिक रोमांचक

  • Written By: Published:
MCC New Cricket Rules

MCC New Cricket Rules : क्रिकेटच्या नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटला अधिक रोमांचक बनवण्यासाठी चक्क 73 नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. हे 73  नवीन बदल मेरीलेबोन क्रिकेट कल्बकडून जाहीर करण्यात आले आहे. या नवीन नियमांमुळे कसोटी क्रिकेटमध्ये देखील काही बदल होणार आहे. हे नियम ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे.

नियमांमध्ये मोठे बदल

एमसीसीने 2022 नंतर प्रथमच नियमांमध्ये बदल केले आहे. नवीन नियमांनुसार आता कसोटी क्रिकेटमध्ये जर शेवटच्या षटकात विकेट पडली तरी देखील शेवटचे षटक पूर्ण करावे लागणार आहे. यापूर्वी शेवटच्या षटकात विकेट पडली तर स्टंपचा निर्णय घेण्यात येत होता मात्र आता असं होणार नाही.

तर दुसरीकडे एमसीसीने विकेटशी संबंधित नियम बदलले आहेत. जर चेंडू टाकण्यापूर्वी यष्टीरक्षक स्टंपसमोर पाऊल ठेवत असेल तर तो नो-बॉल मानला जाणार नाही. एमसीसीने स्पष्ट केले आहे की, चेंडू विकेट ओलांडेपर्यंत किंवा बॅटला स्पर्श करेपर्यंत कीपर स्टंपच्या पुढे येऊ शकत नाही. तथापि, चेंडू टाकेपर्यंत त्यांना स्टंपच्या मागे राहावे लागेल.

बॉलची साइज बदलणार

एमसीसीने बॉलच्या साइजमध्ये थोडा बदल करण्याची योजना आखली आहे. हा नियम पुरुष, महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी लागू करण्यात आला आहे. आता तीन वेगवेगळ्या बॉल साइज असणार आहे. ( साइज 1, साइज 2 आणि साइज 3). साइज 1 पुरुषांसाठी असणार आहे. इतर श्रेणींसाठीही बॉलची साइज समान लागू करण्यात आली आहे.

Wipro, TCS, Infosys सह आयटी शेअर्स घसरले, गुंतवणूकदारांना मोठा धक्का; नेमकं कारण काय?

बनी हॉप कॅचमध्ये बदल

बनी हॉप कॅचमध्ये देखील बदल करण्यात आले आहे. आता खेळाडूला बाउंड्री बाहेरून फक्त एकदाच हवेत चेंडू टच करता येणार आहे. त्यानंतर खेळाडूला बाउंड्रीच्या आत असणे आवश्यक असेल. जर खेळाडूने बाउंड्री बाहेर दोन वेळा उडी मारून चेंडूला टच केल्यास तर ती बाउंड्री मानली जाणार आहे.

follow us