म्हणूनच कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…, अजित आगरकरांवर सर्वात मोठा आरोप

Wasim Jaffer On Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Wasim Jaffer On Virat Kohli

Wasim Jaffer On Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.  इंग्लंडविरुद्धच्या 2025 च्या कसोटी मालिकेपूर्वी कोहलीने निवृत्तीची घोषणा केल्याने बीसीसीआयवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर आता भारताच्या एका माजी खेळाडूने देखील अजित आगरकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडून मिळालेल्या खराब वागणुकीमुळे कोहलीने हा निर्णय घेतला असल्याचा दावा माजी खेळाडू वसीम जाफर यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोहलीमध्ये (Virat Kohli) अजूनही बरीच कसोटी क्रिकेट बाकी होते, परंतु अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या वागणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून त्याने निवृत्ती घेतली. जोपर्यंत खुद्द कोहली याबद्दल बोलत नाही तोपर्यंत खरे कारण समजणार नाही.  त्याच्याशी ज्या प्रकारे वागले जात होते, त्यावरून तो नाखूष असल्याचे दिसते असं एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना वसीम जाफर म्हणाला.

विराटसारखे खेळाडू प्रेक्षकांना स्टेडियमकडे आकर्षित करतात. लोकांना त्यांना खेळताना पाहायला आवडते. तो आणखी कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. जोपर्यंत आपण थेट विराट कोहलीकडून ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला वस्तुस्थिती समजणार नाही. तरीही, तो इंग्लंड (England) दौऱ्याची तयारी नक्कीच करत होता असं देखील यावेळी वसीम जाफर म्हणाला.

सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले, इंडिया आघाडीच्या मोर्चावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा बोलण्यास नकार

विराट कोहली कसोटी कारकीर्द 

विराट कोहलीने जून 2011 मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तो कसोटी संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला. त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आणि 210 डावांमध्ये 9,230 धावा केल्या. विराटने 46.85 ची सरासरी आणि 55.67 चा स्ट्राईक रेट राखला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली. कोहलीची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 होती.

follow us