London School of Economics मध्ये पीएचडी करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघात; ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

London School of Economics मध्ये पीएचडी करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघात; ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

London School of Economics : लंडन मधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ( London School of Economics ) पीएचडी करत असलेल्या 33 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी चेईस्ता कोचर यांचा भीषण अपघात झाला. या घटनेत त्यांच्या जागीच मृत्यू झाला. चेईस्ता कोचर या त्यांच्या पतीसह घरी परतत होत्या. त्यावेळी त्यांचा हा अपघात झाला.

हिंदुंना भगवा दहशतवादी, आतंकवादी म्हणणारे हेच; शिंदेंच्या पत्रावर सातपुतेंचं जोरदार प्रत्युत्तर

19 मार्चच्या दिवशी लंडनमध्ये सायकल चालवत असताना ही भयंकर दुर्घटना घडली. एका ट्रकने त्यांना धडक दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले त्यांचे पती त्यांच्या मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत यातच त्यांचा मृत्यू झाला होता. अत्यंत प्रतिभाशाली आणि हुशार होत्या. कोचर यांच्या या अपघाताबद्दल नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी माहिती दिली.

शिर्डी-ठाण्यात एकनाथ शिंदेंचा धक्का; संभाव्य उमेदवारांची यादी तयार

त्यांनी सांगितलं की, कोचर यांच्यासह मी लाईफ नावाच्या कार्यक्रमात काम केलं आहे. तसेच कोचर यांचे वडील निवृत्त जनरल एसपी आहेत. त्यांच्या अपघातानंतर ते मृतदेह घेण्यासाठी लंडनला गेले आहेत. याबाबत त्यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, मी लंडनला माझ्या मुलीचे पार्थिव घेण्यासाठी पोहोचलो आहे. 19 मार्चला ती सायकल चालवत होती. त्यावेळी एका ट्रकने तिला चिरडलं. या घटनेमुळे आम्ही खूप दुःखी झालो आहोत.

दरम्यान लंडनमधील जगप्रसिद्ध संस्था असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मागच्या वर्षी 7 सेंबरला कोचर या लंडनला गेल्या होत्या. त्याआधी त्यांनी दिल्ली विद्यापीठ, अशोक विद्यापीठ आणि शिकागो विद्यापीठातून देखील पदवीचे शिक्षण घेतला आहे तसेच त्यांनी 2021 ते 20 दरम्यान निती आयोगासोबत काम देखील केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या