London Misal Trailer: मनोरंजनाचा इंग्लिश तडका! ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं धमाकेदार ट्रेलर रिलीज

London Misal Trailer: मनोरंजनाचा इंग्लिश तडका! ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं धमाकेदार ट्रेलर रिलीज

London Misal Trailer Released: जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ (London Misal ) हा मराठी सिनेमा (Marathi Movie) येत्या 8 डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. देशात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव अत्यंत हटके अशा मुख्य भूमिकेमध्ये पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या अनोख्या भूमिकेतून चाहत्यांना गिफ्ट देणाऱ्या भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी पहिल्यांदा सिनेमासाठी रॅप गायन देखील केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा सिनेमा बनवण्यात आका आहे, हे या सिनेमाचे खास वैशिष्ट्य आहे. लंडन मिसळ या मराठी सिनेमातल्या चटपटीत सीन्सनी आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी भरलेला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)


रितिका आणि ऋतुजाचे या सिनेमातील हटके लूक्स कथेतील उत्सुकता वाढवणार आहेत, तर आपल्या अनोख्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची मैफिल भरवताना दिसणार आहे. गौरव मोरेने देखील नेहमीप्रमाणे हास्याचे जोरदार षटकार आपल्या सीन्समधून मारले आहेत. यामुळे या सिनेमाच्या रिलीजची उत्सुकता वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीजचा सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्रीकांत भारतीय हे सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

‘लंडन मिसळ’ या मराठी सिनेमाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत, तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे, तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे, तर ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. या सिनेमातील गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहे.

Kanni : “मैत्री, प्रेम अन् स्वप्नांची…”, ‘कन्नी’ ची रिलीज डेट जाहीर! ‘या’ दिवशी होणार रिलीज

वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. सिनेमात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळाले आहेत, तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहेत आणि ही चाहत्यांसाठी मोठी मेजवानी असणार आहे. आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या ‘दोन सख्ख्या बहिणींची’ ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या मराठी सिनेमात अनुभवायला मिळणार आहे.या सिनेमाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहे .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube