London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; ‘लंडन मिसळ’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; ‘लंडन मिसळ’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

London Misal: ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ (London Misal) लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा मराठी सिनेमा येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या मराठी सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी भरत जाधव (Bharat Jadhav) एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by London Misal Marathi Film (@londonmissal)


आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदा मराठी सिनेमासाठी रॅप गायन देखील केल्याचे दिसत आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा सिनेमा प्रेरित आहे, हे या सिनेमाचे एक वैशिष्ट्य असणार आहे. ‘लंडन मिसळ’ या मराठी सिनेमाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत, तर सह-निर्माते सानिस खाकुरेल असणार आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे, तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी सांभाळली आहे.

पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. तर वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. तसेच या सिनेमातील गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणार आहेत.

Shastri Viruddh Shastri Trailer Out: ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

या मराठी सिनेमात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत, तर भरत जाधव एका हटके भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करताना बघायला मिळणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार आहे. आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची रंजक कथा असणार आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना कायम करावा लागतो, आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची चांगलीच जुगलबंदी आपल्याला या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करणार आहे .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube