Shastri Viruddh Shastri Trailer Out: ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Shastri Viruddh Shastri Trailer Out: ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Shastri Viruddh Shastri Movie: परेश रावल (Paresh Rawal) हे बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता ते त्यांच्या आगामी ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’ (Shastri Viruddh Shastri) या सिनेमामुळे परत एकदा जोरदार चर्चेत आले आहेत.

या सिनेमात ते आजोबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना मनोरंजन (Entertainment) करताना बघायला मिळणार आहेत. आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याची अनोखी कहाणी या सिनेमाद्वारे आपल्याला बघायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा इमोशनल ट्रेलर (Shastri Viruddh Shastri Trailer) प्रदर्शित करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर त्यांच्या बहुप्रतिक्षित फॅमिली ड्रामा सिनेमा ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. परेश रावल आणि बंगाली सिनेमासृष्टीत एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या मिमी चक्रवर्ती ही मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. तसेच या सिनेमात अमृता सुभाष, मनोज जोशी, नीना कुलकर्णी आणि शिव पंडित यांच्यासारखे दमदार कलाकार मनोरंजन करताना बघायला मिळणार आहेत.

हा संपूर्ण सिनेमा एका 7 वर्षांच्या मुलाभोवती फिरतो. जो आपल्या पालकांमधील भावनांच्या कठीण भोवऱ्यात अडकतो. मुलाचे आजी-आजोबाही त्याच्यावर खूप प्रेम करत असतात. या मुलावर कोणाचा अधिकार आहे? असा प्रश्न निर्माण होतो आणि मुलाचे आई-वडील आणि आजी-आजोबा कोर्टामध्ये धाव घेतल्याचे बघायला मिळाले आहे. हा मुलगा नेमका कोणाकडे राहणार हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. सिनेमा भावनिक कोर्टरूम ड्रामावर आधारित असल्याचे बघायला मिळणार आहे.

Muktaai Movie: संत पंरपरेचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘मुक्ताई’ सिनेमाच पोस्टर प्रदर्शित

यामध्ये प्रेमाची गुंतागुंत, त्याच्याशी संबंधित जबाबदाऱ्या आणि पालकांचे हक्क यावर सुंदरपणे प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सिनेमा समकालीन आणि विचार करायला लावणाऱ्या कथेवर आधारित आहे. प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल असा विश्वास देखील निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. हा सिनेमा येत्या 3 नोव्हेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube