Muktaai Movie: संत पंरपरेचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘मुक्ताई’ सिनेमाच पोस्टर प्रदर्शित

Muktaai Movie: संत पंरपरेचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘मुक्ताई’ सिनेमाच पोस्टर प्रदर्शित

Muktaai Poster Release Out: ‘शिवराज अष्टका’तील सिनेमाना मिळत असलेल्या यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा इतिहास उलगडणारा ‘मुक्ताई’ (Muktaai Marathi Movie) सिनेमा आता लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) असणार आहेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)


महाराष्ट्रात स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या आहे. त्यामध्ये ‘संत मुक्ताई’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागणार आहे. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे आणि श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, ‘श्रेष्ठपणे श्रेष्ठ’, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’ असे वर्णन केले आहे. आता त्यांच्या जीवनावर आधारित लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाईना ओळखले जाते. माऊलींप्रमाणे त्यांचेही आयुर्मान तुलनेने तसे फारच कमी होते. परंतु, त्यांच्या हातून घडलेले कार्य हे खूप महान ठरले आहे. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय आणि प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन असल्याचे ऐकायला मिळत होते. छोट्या आयुष्यामध्ये या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचल्याचे बघायला मिळाले आहे.

Jaybhim Panther: ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष नवा मराठी सिनेमा लवकरच

स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा एक अनोखा आदर्श उभा केला आहे. अशा या ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आगामी ‘मुक्ताई’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘शिवराज अष्टका’तील सिनेमाना मिळत असलेल्या यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘मुक्ताई’ सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहेत. ‘मुक्ताई’ सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube