इस्रायलकडून ब्रेनवॉश अन् इराणवर हल्ला; अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांकडून सर्वात मोठा खुलासा

Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचा मोठा फटका जगाला बसताना दिसत आहे.

Donald Trump

Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचा मोठा फटका जगाला बसताना दिसत आहे. शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर अचानक हल्ला करण्यात आल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे. इस्त्रायल आणि इराणच्या या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

इराणने एकाच वेळी इस्त्रायलसह (Israel) अनेक अरब देशांवर ड्रोन हल्ले सुरु केले आहे. इराणने अरब देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकी अड्ड्यांवर हल्ले करत आहे. तर आता अमेरिकेने इराणवर हल्ला का केला याबाबत सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा ब्रेनवॉश केल्याने ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो (Marco Rubio) सांगितले की, इस्रायलने आधीच इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमेरिका या संघर्षात उतरली. अमेरिकेला (America) भीती होती की, जर इस्रायलने एकट्याने हल्ला केला तर इराण आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना टार्गेट करु शकते. यामुळे ट्रम्प प्रशासनाला इस्रायलला पाठिंबा देण्यास आणि प्रथम इराणवर हल्ला करण्यास भाग पाडले. तर दुसरीकडे ट्रम्प सरकारला अमेरिकेत टीकेचा सामना करावा लागत आहे. इस्रायलने अमेरिकेसाठी दिलेला धोका समजून घेणे ही गंभीर चूक आहे का? असा सवाल काँग्रेस सदस्य मार्क वॉर्नर यांनी विचारला आहे.

तर दुसरीकडे इराणचे (Iran) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आक्रमक भूमिका घेत इस्त्रायलसह अरब देशांवर जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इराणने यूएई, सौदी अरेबिया, कुवैत सारख्या देशात असणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी तळांना टार्गेट केले आहे.

मोठी बातमी! मुजतबा खामेनेई इराणचे नवे ‘सर्वोच्च नेते’; असेंबली ऑफ एक्सपर्टने केली घोषणा-

तर इस्त्रायलची राजधानी तेलअवीवीवर देखील मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या युद्धाचा मोठा फटका जागतिक व्यापाराला बसत असल्याने अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

follow us