Kanni : “मैत्री, प्रेम अन् स्वप्नांची…”, ‘कन्नी’ ची रिलीज डेट जाहीर! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Kanni : “मैत्री, प्रेम अन् स्वप्नांची…”, ‘कन्नी’ ची रिलीज डेट जाहीर! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Kanni Movie Date Announced : मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ (Kanni Marathi Movie) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Marathi Movie) आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा मराठी सिनेमा येत्या 8 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या मराठी सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी सांभाळली आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहेत. तर निर्माते अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी आहेत.

या सिनेमाच्या वितरणाची धुरा ‘ए ए फिल्म्स’ यांनी सांभाळली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवरून हा सिनेमा खूपच इंटरेस्टिंग असल्याचे बघायला मिळत आहे. मैत्री आणि प्रेमाला जोडणारी ही ‘कन्नी’ नात्यांची एक नवीन गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

Rohit Bal Health: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

या सिनेमाबद्दल बोलताना समीर जोशी म्हणतात की, ज्याप्रमाणे बेभान उडणारा पतंग हवेत त्याचा तोल मजबूत कन्नीमुळे सांभाळू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा, स्वप्नांचा पतंग देखील मैत्री, प्रेम यांची मजबूत कन्नी असली की अगदी चंद्राशेजारी सुद्धा पोहोचू शकणार आहे, याच प्रेम आणि मैत्रीच्या ‘कन्नी’ची तरूण, ताजी, मस्तीखोर आणि तितकीच आपलीशी वाटेल अशी गोष्ट म्हणजे ‘कन्नी’ हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहांत बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube