Rohit Bal Health: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
Rohit Bal Health: बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) रोहित बाल (Rohit Bal) यांना एनसीआरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे. एनसीआर येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित तब्येतीच्या कारणाने चर्चेत आहे. रोहित बाल यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
रोहित बाल यांचा जन्म 8 मे 1961 रोजी श्रीनगरमध्ये या ठिकाणी झाला आहे. आता ते 62 वर्षांचे आहेत. 2010 मध्ये रोहित यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रोहित यांना दारूचं व्यसन होतं. रोहित यांची 2022 मध्ये तब्येत खालावली होती. त्यावेळी त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना अभिनेते दिलीप प्रभावळकर भावूक; सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास
देशातील लोकप्रिय फॅशन डिझायनरच्या यादीमध्ये रोहित बाल यांचा समावेश होतो. मुगल फॅशनला प्रोत्साहन देण्यात रोहित बाल यांचा खूप मोठा वाटा आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी रोहित यांचे फॅशन स्टोर आहेत. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये रोहित खूप लोकप्रिय आहे.
अमिताभ बच्चन, कंगना रनौत, काजोल, करीना कपूर, सोनम कपूर आणि ईशा गुप्तासह अशा अनेक वेगवेगळ्या सेलिब्रिटींचे फॅशन डिझायनर रोहित यांनी केले आहे. 2001 आणि 2004 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘डिझायनर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोहितने ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमातील बिग बी यांचे ड्रेस देखील डिझाइन केले आहेत.