प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानकडून दसऱ्याचा खास संदेश; इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरुन चिंता…

प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानकडून दसऱ्याचा खास संदेश; इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरुन चिंता…

Zareen Khan Special Dussehra Message : साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा (Dussehra 2023)या सणाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपण विजयादशमी साजरा करतो यालाच आपण दसरा सुद्धा म्हणतो. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood actress) झरीन खानने (Zareen Khan)आपल्या चाहत्यांना एक खास संदेश देत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या जाणार, सरसंघचालकांचं जनतेला आवाहन

झरीनने आपल्या संदेशामध्ये दसऱ्याला शांती आणि करुणेचे आवाहन केले आहे. वाईटावर चांगूलपणाच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा हा सण, लाखो लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करतो, त्यामुळे अभिनेत्री झरीन खानने देखील यंदाच्या दसऱ्याला एक खास इच्छा व्यक्त केली आहे.

मणिपूर हिंसाचारामागे नेमकं कोण? सवाल विचारत सरसंघचालकांनी दिला ‘रोडमॅप’

झरीन खान म्हणते, या दसऱ्याला मला मनापासून इच्छा आहे की, सध्या जगातील काही देशांदरम्यान सुरु असलेले अमानुष युद्ध संपुष्टात यावे. त्या ठिकाणी लोकांचं जीवन क्रूरपणे संपवलं जात आहे, ते संपुष्टात यावे आणि त्या त्या देशांमध्ये शांतता निर्माण व्हावी, अशी इच्छा अभिनेत्री झरीन खानने व्यक्त केली आहे.

झरीनचा हा संदेश नक्कीच उल्लेखनीय आणि विचार करायला भाग पाडणारा आहे. कारण दसरा हा एक सण तर आहेच पण सोबतच सामूहिक चिंतन आणि नवीन निश्चय करण्याची संधी देखील आहे. त्यामुळे झरीनने जगात शांतता निर्माण होऊन हा दसरा आपण साजरा करुया असा हा खास संदेश तिने यातून दिला आहे. आपण दसरा साजरा करत असताना झरीन खानचा संदेश लक्षात ठेऊन हा सण साजरा करण्याचा संकल्प करुयात.

इस्त्रायल अन् पॅलेस्टाईनचं युद्ध संपावं :
इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे.

अमेरिकेच्या पुढाकारानंतर आता येथील लोकांना काही प्रमाणात मदत मिळत आहे. मात्र, दहशत कमी झालेली नाही. इस्त्रायलचे सैन्य जमिनीवरून हल्ले करण्यासाठी सज्ज झाले आहे. आता इस्त्रायलने उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर गाझातील नागरिकांनी हा भाग तत्काळ रिकामा करावा नाहीतर त्यांनाही दहशतवाद्यांचे साथीदार समजून नष्ट केले जाईल असा इशारा इस्त्रायलच्या लष्कराने दिला आहे.

हे दोन देशातील महायुद्ध लवकरात लवकर शांत व्हावं अशी अपेक्षा अभिनेत्री झरीन खानने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर झरीनने आपल्या चाहत्यांना दसऱ्याच्या खास शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube