आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या जाणार, सरसंघचालकांचं जनतेला आवाहन
Mohan Bhagwat on India Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये (loksabha election 2024)समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या गोष्टींपासून जनतेनं दूर राहावं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी केलं आहे. देशातील असुरी शक्तींना देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा मिळत आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (india alliance)जोरदार निशाणा साधला.
Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार
नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा आयोजित करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरसंघचालकांनी मणिपूरमधील परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.
Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात
सरसंघचालक म्हणाले की, येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. निवडणुकांच्या काळात समाजा-समाजातील भावना भडकावून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजात फूट पाडणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवावं. मतदान करणे आपल्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, त्याचं प्रत्येकानं पालनदेखील केलं पाहिजे.
2024 च्या निवडणुकांच्या काळात कोणी कितीही चिथावणी दिली तरी परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करत, नागरी शिस्त पाळण्याचे आवाहनही यावेळी सरसंघचालकांनी केले. स्वतंत्र देशात ही अशी वागणूकच देशभक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून तयार होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात तुम्ही अडकू नका असेही यावेळी सरसंघचालक म्हणाले.
राजकीय स्वार्थासाठी अनिष्ट शक्तिंशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. असं म्हणत नाव न घेता इंडिया आघाडीवर निशाणा साधला. राक्षसी शक्तिंना बाह्य शक्तिंचाही सहज पाठिंबा मिळू शकतो असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.