मणिपूर हिंसाचारामागे नेमकं कोण? सवाल विचारत सरसंघचालकांनी दिला ‘रोडमॅप’

मणिपूर हिंसाचारामागे नेमकं कोण? सवाल विचारत सरसंघचालकांनी दिला ‘रोडमॅप’

Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र सरकार मजबूत आणि तत्पर आहे. खुद्द गृहमंत्री तीन दिवस तिथे जाऊन राहिले. सर्व प्रयत्न केले. देशाचं सरकार मणिपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण तरीही वाद होत राहिले. कारण शांतीचा प्रयत्न चालू असतानाच काहीतरी वाद निर्माण केले जात होते. ही हिंसा भडकावणारे लोक कोण होते. हे होत नाही तर केलं जात आहे. त्यामुळे आता आपल्याला खूप काम करावं लागेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

नागपूर येथे आज विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रसिद्ध गायक शंकर महादेवन उपस्थित होते. सुरुवातीला पथसंचलन झाले. त्यानंतर गायक महादेवन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.

Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप, नेपाळही हादरला!

सरकारचीही इच्छाशक्ती आहे पण.. 

हिंसाचारग्रस्त मणिपूरला शांत कसं करता येईल, यावरही भागवत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, तिथं लोकांची मनं दुखावली आहेत. फक्त शांती नाही, आता समाजाला जोडण्याचं काम करावं लागेल. संघाचे स्वयंसेवक आधीही तेच काम करत होते. आजही करत आहेत. अशा स्थितीत समाजात फूट पडू नये यासाठी काम केले जात आहे. या राज्यात स्वयंसेवकांनी जे काम केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता तिथे सगळ्यांनाच काम करावं लागेल. सरकारचीही इच्छाशक्ती आहे पण प्रशासनाचाही हातभार गरजेचा आहे. अविश्वास कमी करण्यासाठी तिथल्या स्थानिक नेतृत्वालाही काम करावं लागेल, असे भागवत म्हणाले. परस्परांवर टीका टिप्पणी न करता एकतेच्या दिशेने वाटचाल करत राहणे हेच अशा समस्यांवर खरं उत्तर आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

समाजात फूड पाडणाऱ्यांपासून सावध राहा  

सन 2024 मध्ये देशात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न होत राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने सावध राहावे. भावना भडकावणाऱ्या अशा गोष्टींपासून दूर राहा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार

जानेवारीत अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन त्या शुभ प्रसंगी अयोध्येत मर्यादीत संख्येतच उपस्थित राहता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या प्रवेशाने प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन भागवत यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube