Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप, नेपाळही हादरला!

Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप, नेपाळही हादरला!

Earthquake : जगभरात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणव आहेत. रविवारी नेपाळसह उत्तर भारतात काही ठिकाणी जमीन हादरली होती. त्यानंतर आता पुन्हा नेपाळ आणि तैवानमध्ये (Earthquake in Taiwan and Nepal) शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी तैपेईमध्ये तीव्र धक्क्यांमुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी आणि कोणतेही नुकसान झालेले नाही. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात होता.

Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन

तैवानची राजधानी तैपेई शहरात आज सकाळी हा भूकंप झाला. इमारतींना हादरे बसू लागले. लोकांची भीतीने गाळण उडाली. काही कळण्याच्या आत ही घटना घडली. त्यामुळे लोक इमारतीतून पळत बाहेर आले. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात असल्याचे सांगण्यात आले. यानंतर नेपाळमध्येही पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी रविवारीच नेपाळमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा नेपाळमध्ये जमीन हादरली.

नेपाळमध्ये वारंंवार भूकंपाचे धक्के 

16 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ही घटना ताजी असतांनाच रविवारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान, भारतातील बिहार राज्याच्या अनेक भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले होते. रविवारी सकाळी पाटणासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

Israel Hamas War : ‘गाझा तत्काळ सोडा नाहीतर’.. इस्त्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार नेपाळची राजधानी काठमांडू येथे रविवारी रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. सकाळी 7:24 वाजता नेपाळच्या काही भागात या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही त्याचे धक्के जाणवले. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर खाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube