शिर्डी-ठाण्यात एकनाथ शिंदेंचा धक्का; संभाव्य उमेदवारांची यादी तयार
Shivsena Shinde Group Loksabha Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कालच भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाल्यानंतर आज लगेचच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) उमेदवारांची संभाव्य यादी करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून धक्काच दिला आहे. शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाणे मतदारसंघातून प्रताप सरनाईकांना (Pratap Sarnaik) उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आलेलं नसून शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी लेट्सअपच्या हाती लागली आहे.
शिर्डीमध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत. तर काही दिवसांपूर्वीच भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत शंकाकुशंका होती. अखेर भाऊसाहेब कांबळे हेच संभाव्य उमेदवार असू शकतात असं दिसून येत आहेत. तर ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. राजन विचार यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तगडा उमेदवार द्यावा लागणार असल्याने शिंदे गटाकडून सलग तीनवेळा आमदार राहिलेले प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा होती. अखेर संभाव्य उमदेवारांच्या यादीत सरनाईकांचं नाव समोर आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे.
ईडीमध्ये अधिकारी होण्याची संधी, महिन्याला 1,51,000 रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
संभाव्य उमेदवारांची नावे
रामटेक – राजू पारवे
वाशिम-यवतमाळ – संजय राठोड
ठाणे – प्रताप सरनाईक
कल्याण डोंबिवली – श्रीकांत शिंदे
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
मावळ – श्रीरंग बारणे
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशील माने
बुलढाणा – प्रतापराव जाधव
शिर्डी – भाऊसाहेब कांबळे
नाशिक – शांतिगिरी महाराज
संभाजीनगर – संदीपान भुमरे
पालघर :- राजेंद्र गावीत
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाबाबत अद्याप अंतिम चर्चा झाली नसल्याने महायुतीच्या घटक पक्षांकडून अधिकृतपणे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. नुकतेच 13 उमेदवारांचे संभाव्य नावे समोर आले असून मुंबई लोकसभा मतदारसंगाबाबत अद्याप निश्चित नाव कोणाचही समोर आलेलं नाही.ृ