ईडीमध्ये अधिकारी होण्याची संधी, महिन्याला 1,51,000 रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
ED Recruitment 2024 : गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय बनलेली एक तपास यंत्रणा म्हणजे ईडी. ईडीचं (ED Recruitment) नाव घेतलं की, अनेकांना धडक भरती. नुकतंच ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. दरम्यान, ईडीमध्ये नोकरी (ED Job) शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली. ईडीने उपसंचालक ते ड्रायव्हर या पदांच्या रिक्त जागा भरण्यसााठी भरती सुरू केली.
मराठ्यांनंतर धनगर समाजानेही रान पेटवलं; 15 मतदारसंघात निवडणूक लढणार…
या पदांसाठी आवश्यक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ईडीच्या अधिकृत वेबसाइट enforcementdirectorate.gov.in वर जाऊन उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
ईडीच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार 16 एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैकचा हॉट अंदाज
पात्रता आणि वयोमर्यादा
ED च्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून CA, ICWA, Diploma, Graduation, PGDM, MBA, MSW, PG डिप्लोमा, PG पदवी घेतलेली असावी. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना पाहावी. तसेच, 1 ते 40 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादेशी संबंधित सर्व माहिती अधिसूचनेत सविस्तर दिले आहेत.
पगार
ईडीच्या या भरती अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन दिले जाईल. पदानुसार उमेदवारांना 1,51,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अधिसूचना – https://enforcementdirectorate.gov.in/vacancies
अर्ज करण्यासाठी लिंक – https://enforcementdirectorate.gov.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल
निवड प्रक्रिया-
ईडीच्या या भरतीची अधिसूचना आणि अर्ज enforcementdirectorate.gov.in या वेसबाईटवर उपलब्ध आहे. अर्ज भरल्यानंतर उमदेवारांची चाचणी/मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना दिल्लीत नियुक्त केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना एपीजे अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली, 110011 दिल्ली येथे काम करावे लागेल.