आम आदमी पार्टीला आणखी एक धक्का; आमदाराच्या घरी ‘ईडी’चा छापा

आम आदमी पार्टीला आणखी एक धक्का; आमदाराच्या घरी ‘ईडी’चा छापा

ED Raids AAP MLA : दिल्ली दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने अटक केली. आता केजरीवाल कोठडीत असतानाच आम आदमी पार्टीला दुसरा (AAP) मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीतील आणखी एका आमदाराच्या घरी धडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी दिल्लीतील मटियाला मतदारसंघाचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे.

मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejriwal यांच्या घरी ईडी धडकली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एएनआय वृत्तसंस्थेने या कारवाईची माहिती देताना सांगितले की ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुलाब सिंह यादव यांच्या ठिकाणांची तपासणी केली. ही कारवाई अशा वेळी झाली आहे ज्यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी या पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांचा फोटो शेअर करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य लिहिले होते.

गुलाब सिंह यादव आम आदमी पक्षाचे दोन वेळचे आमदार आहेत. सध्या ते दिल्लीतील मटियाला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या व्यतिरिक्त यादव गुजरात विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाचे प्रभारी राहिले आहेत.

केजरीवालांना सात दिवसांची ईडी कोठडी 

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकारी व वकिलांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. मद्य घोटाळ्यातील (Delhi liquor policy case) पैशांचे दोन वेळेस हस्तांतर झाले असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे याबाबत चौकशी करण्यासाठी दहा दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी इडीने केली आहे. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. शुक्रवारी रात्री न्यायालयाने याबाबत निकाल दिला असून, केजरीवालांना सात दिवसांची 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनाविण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube