डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित

Rubab या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली.

The title song of ‘Rubab’, which tells the love struggle of a dashing couple, is released : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते.

मोबाईलचं कारण ठरलं जीवघेण, पत्नीने रागाच्या भरात मुलाला विहिरीत ढकललं अन्…

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो.

त्यांना पाहत राहणं एक शिकवण होती; संजय मिश्रांनी शेअर केली NSD मधील इरफान खानची आठवण

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार – महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; बाळासाहेब थोरातांकडून बारामतीत पवार कुटुंबीयांचं सांत्वन

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, ” ‘रुबाब’ हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.”

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर कोणीही बालू नये; केवळ तीन नेत्यांवरच जबाबदारी, शरद पवारांच्या पक्षाकडून स्पष्ट आदेश

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us