मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejriwal यांच्या घरी ईडी धडकली

Arvind Kejarival यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीची धाड

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या घरी मद्य घोटाळा प्रकरणी (Delhi liquor scam case) ईडीच पथक दाखल झालं आहे. अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. तर या घोटाळ्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना काही दिवसांपूर्वीच अटक झालेली आहे.
रामदास आठवलेंच्या कारला अपघात, वाईजवळ कंटेनरने दिली जोरात धडक

यामध्ये घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने आतापर्यंत आठ वेळा समन्स बजावले होते. परंतु केजरीवाल हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेलेले नाहीत.त्यानंतर ईडीने (ED) कोर्टात धाव घेतल्यानंतर ही न्यायालयीन लढाई केजरीवाल हरले आहेत. त्यामुळे त्यांना कोर्टामध्ये हजर राहावे लागलं. ज्या समन्सला केजरीवाल यांनी आव्हान दिलं होतं. त्याला जिल्हा न्यायालयामध्ये देखील फेटाळून लावण्यात आलं. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. आजच त्यावर सुनावणी झाली.

केजरीवालांना न्यायालयाने फटकारले!
त्यावेळी न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारले की, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज का केला नाही? तुम्हाला एवढे समन्स जारी करण्यात आले आहेत. इतके दिवस कोर्टात का आला नाहीत? तुम्ही आतापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करायला पाहिजे होता. त्यामुळे आता आम्हाला समन्सला स्थगिती देता येणार नाहीत. त्यामुळे 22 एप्रिलला तुम्हाला हजर राहावं लागेल असं कोर्टाने सांगितलं.

वय नाही तर जिद्द महत्त्वाची, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार

केजरीवाल यांच्याकडून आता सर्व कायदेशीर लढाई लढून झाल्यानंतर केजरीवाल यांच्यावर अटकेसारखी कारवाई देखील होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण केजरीवाल यांनी ईडीला अटकेची कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी देखील न्यायालयाकडे केली होती. मात्र त्यावर न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

follow us