रामदास आठवलेंच्या कारला अपघात, वाईजवळ कंटेनरने दिली जोरात धडक

रामदास आठवलेंच्या कारला अपघात, वाईजवळ कंटेनरने दिली जोरात धडक

Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा येथील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले मुंबईहून वाईला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली.

वय नाही तर जिद्द महत्त्वाची, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार 

प्राथमिक माहितीनसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घटला. आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला आहे. सुदैवाने आठवले या अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांना कोणत्याही प्रकाराची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

वय नाही तर जिद्द महत्त्वाची, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार 

रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर रामदास आठवले यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र, आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अपघाताच्या वेळी आठवले यांच्यासह त्यांची पत्नी आणि कुटुंबीयही गाडीत होते. आपल्या वाहनास अपघात झाला असाल तरी आपण आणि आपले कुटुंबीय सुखरुप आहोत…. कोणताही दुखापत झाली नाही, अशी माहिती आठवलेंनी दिला.

माहिती देताना रामदास आठवले म्हणाले की, आपण राजकीय दौऱ्यावर होतो. पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक होती. महाबळेश्वरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीनंतर मुक्काम करून आम्ही निघालो असतांना खंडाळा येथील बोगद्यात एक वाहन आमच्या वाहनावर आदळले. त्यामुळं हा अपघात झाला. अपघात झाला असला तरी आम्ही सुखरूप आहतो. आम्हाला कोणतीही दुखापत झाली नाही..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज