पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव

  • Written By: Published:
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव

Shambhuraj Desai First Reaction After Satyajit Patankar join BJP : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यजीत पाटणकर यांचा भाजप प्रवेश होऊन एक दिवस उलटत नाही तोच आता या प्रवेशावरून नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार असल्याचे संकेत देत देसाई यांनी  पाटणकर यांना विरोध करण्यासाठी भात्यात बाणांची जमावाजमव करण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.shambhuraj desai Vs Satyajit Patankar

संग्राम जगताप यांना कोंडीत पकडण्यासाठी खुद्द शरद पवार नगरच्या मैदानात; कट्टर कार्यकर्ता फोडला

काय म्हणाले शंभुराज देसाई?  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याकडे कसं बघता असे विचारले असता शंभुराज म्हणाले की, आम्ही याच्यावर बोलणं योग्य नाही, आम्ही आमचं काम करतोय. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री आहेत. यादरम्यान महायुती म्हणून सगळीकडे काम केलं आहे. मंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत.

दादा ‘ते’ गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही…हाकेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं

राजकीय मतभेद असणाऱ्यांचा महायुतीतील मोठ्या पक्षात प्रवेश

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, तीन पिढ्यापासून राजकीय मतभेद असून, राजकीय मतभेद असणाऱ्या लोकांचा महायुतीतील मोठ्या पक्षात प्रवेश झाला आहे. 1980 मध्ये बाळासाहेब देसाई यांच्या आयुष्यातील शेवटची विधानसभा निवडणूक होती. त्यावेळी विक्रमसिंह पाटणकर यांनी बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात बंडखोरी केल्याचा पुनुरूच्चारही यावेळी देसाईंनी केला. मी एक शिस्तबद्ध शिवसैनिक असल्यानं याबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी दोघांकडेही भेटीची वेळ मागितली असल्याचे देसाई यांनी सांगितले. माझं मत दोन्ही नेत्यांसमोर मांडणार आहे. त्यानंतर मला आवश्यकता वाटली तर माध्यमांसोबत बोलणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.

जयंत पाटलांनंतर प्रदेशाध्यपदासाठी दोन नेत्यांची चर्चा; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं

पाटणकरांच्या भाजप प्रवेशावेळी उदयनराजे हजर

पाटणकरांच्या प्रवेशावेळी लक्षवेधी ठरली ती खासदार छ.उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची उपस्थिती. उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे भाजपनं शंभुराज देसाई यांना एकप्रकारे सिग्नलचं दिला असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. सत्यजीत पाटणकर हे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्याच पाटणकरांना भाजपनं पक्षात घेतल्याने देसाईंच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपनचं टाकलेला हा डाव असल्याचे बोलले जात आहे. आता हा डाव टाकल्यानंतरदेखील पाटणकरांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार उदयनराजेंच्या उपस्थतीमुळे पक्षाने एकप्रकारे पहिल्याच दिवसापासून पाटणकरांची ताकद वाढवल्याचा आणि सातारा, कराडसह अन्य मतदारसंघात भाजपशिवाय कुणी नाही असाच सिग्नल देसाई यांना दिल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube