Shambhuraj Desai : शिवतारेंचा निर्णय व्यक्तिगत; देसाईंच्या सूचक प्रतिक्रियेने अजितदादांचं टेन्शन वाढलं

Shambhuraj Desai : शिवतारेंचा निर्णय व्यक्तिगत; देसाईंच्या सूचक प्रतिक्रियेने अजितदादांचं टेन्शन वाढलं

Shambhuraj Desai : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी निवडणुक लढवण्याच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. देसाईंच्या या प्रतिक्रेयेने मात्र अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे. कारण देसाई म्हणाले की, शिवतारे यांनी व्यक्त केलेलं मत म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. देसाई आज माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महायुतीत ‘मनसे’ची एन्ट्री? जागावाटपाचा फॉर्म्युला तयार, भाजप-शिवसेनेचं गणित काय?

यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, विजय शिवतारे आमच्या पक्षाचे माजी राज्यमंत्री आहेत. तसेच पक्ष संघटनेमध्ये ते सक्रीय आहेत. पण त्यांनी एखाद मत व्यक्त केलं म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. पण तरी देखील महायुती म्हणून जेव्हा आपण एकत्र आहोत. तेव्हा बारामती बाबत आमच्या तीन नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाशी विसंगत भूमिका शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने घेणे योग्य नाही. असं म्हणत शंभूराज देसाई यांनी शिवतारेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

भूमी पेडणेकरने ओटीटी प्रोजेक्टबद्दल थेटच सांगितलं; म्हणाली, ‘देशातील आघाडीच्या अभिनेत्री…’

अजितदादांविरोधात विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभेला अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, शिवतारेंच्या या निर्णयामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मात्र शिंदे गटाकडून शिवतारे यांची समज काढण्यात येईल. त्यांना निवडणुक न लढण्याचे सांगितले जाईल अशी आपेक्षा अजित पवार यांना असताना मात्र शिंदे गटाकडून म्हणजे शंभूराज देसाई यांनी मात्र शिवतारे यांनी व्यक्त केलेलं मत म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. असं म्हणत एक प्रकारे शिवतारे यांच्या भूमिकेवर सावध भूमिका घेत. अंग काढून घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता देसाईंच्या सूचक प्रतिक्रियेने अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज