Satara Politics : पाटणकरांच्या भाजप प्रवेशावेळी उदयनराजे हजर; शंभुराज यांना सिग्नल दिलाय

  • Written By: Published:
Satara Politics : पाटणकरांच्या भाजप प्रवेशावेळी उदयनराजे हजर; शंभुराज यांना सिग्नल दिलाय

MP Udayanraje Bhosale Present While Satyajeet Patankar BJP Joining : पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांचा अखेर आज (दि.10) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. पण, पाटणकरांच्या प्रवेशावेळी लक्षवेधी ठरली ती खासदार छ.उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची उपस्थिती. उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे भाजपनं शंभुराज देसाई यांना एकप्रकारे सिग्नलचं दिला असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.(Satyajeet Patankar BJP Joining )

पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

भित्तीचित्रावरून उदयनराजे-शंभुराज यांच्यात बिनसले

दोन वर्षांपूर्वी भित्तीचित्रावरून खासदार उदयनराजे आणि शंभुराज यांच्यात बिनसले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या इमारतीच्या भिंतीवर राजे समर्थकांना त्यांचे चित्र रेखाटायचे होते. पोवई नाक्यावरील ज्या ठिकाणी हे भित्तीचित्र रेखाटले जाणार होते ती भिंत मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाला अगदीच खेटून होती. पोवई नाक्यावरील ज्या इमारतीवर उदयनराजेंचे भित्तीचित्र काढण्याचे होते. त्यावर पोलिसांनी हरकत घेतली होती. एवढेच नव्हे तर, चित्र काढण्यास शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनीदेखील त्यावेळी हरकत घेतली होती. त्यानंतर शंभूराज देसाई आणि उदयनराजे यांच्यात वितुष्ट आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (Satyajeet Patankar BJP Joining )

सातारा, कराडसह अन्य भागात भाजपचं

सत्यजीत पाटणकर हे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्याच पाटणकरांना भाजपनं पक्षात घेतल्याने देसाईंच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपनचं टाकलेला हा डाव असल्याचे बोलले जात आहे. आता हा डाव टाकल्यानंतरदेखील पाटणकरांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार उदयनराजेंच्या उपस्थतीमुळे पक्षाने एकप्रकारे पहिल्याच दिवसापासून पाटणकरांची ताकद वाढवल्याचा आणि सातारा, कराडसह अन्य मतदारसंघात भाजपशिवाय कुणी नाही असाच सिग्नल देसाई यांना दिल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जयंत पाटलांचा राजीनामा अन् पत्र दोन्हीही…; सुप्रिया सुळेंनी सांगितली पडद्यामागची महत्त्वाची घडामोड

उदयनराजे अन् शंभुराज यांचे संबंध सलोख्याचे

छायाचित्र रेखाटन हा प्रकारच मला माहीत नव्हता. खासदार उदयनराजे भोसले हे आमचे जवळचे मित्र व पक्षातील सहकारी आहेत. त्यांचे रेखाचित्र चितारले जाणार असेल तर मला आनंदच असल्याचे सांगत शंभुराज यांनी या वादावर पडदा टाकला होता. त्यामुळे एकीकडे पाटणकर यांच्या पक्ष प्रवेशावेळी जरी उदयनराजेंची उपस्थिती शंभुराज यांना भाजपशिवाय कुणी नाही असा सिग्नल देणारी असली तरी, राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तर, राजघराणे आणि शंभुराज देसाई यांच्या घराण्याचे अनेक पिढयाचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, सातारा, कराडसह अन्य मतदारसंघात भाजपशिवाय कुणी नाही हाच सिग्नल देसाई यांना पाटणकरांच्या पक्ष प्रवेशावेळी उदयनराजेंच्या माध्यमातून भाजपनं शंभुराज यांना दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसह अन्य निवडणुकांमधून नेमकं कसं राजकारण खेळलं जातं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

शंभुराज देसाईंचा छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा 

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि शंभुराज देसाई यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से असून, उदयनराजे आणि शंभुराज देसाई हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी दोघांनीही नेहमी एकमेकांचा आदर ठेवला आहे. तसेच वेळोवेळी अडचणीच्या काळात एकमेकांना मदतही केलेली आहे. मध्यंतरीच्या काळाच या दोन्ही नेत्यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यात शंभुराज देसाई हे छ. उदयनराजे भोसल यांना भररस्त्यात मुजरा करताना दिसले होते.

Raje

एका लग्न समारंभासाठी देसाई कोल्हापूरला जात होते तर, खासदार उदयनराजे भोसले हे गोव्याच्या दिशेने चालले होते. त्यावेळी कोल्हापूरनजीक शिरूळ एमआयडीसी महामार्गावर उदयनराजेंना पाहून शंभुराज देसाईंनी त्यांची गाडी थांबवली. यावेळी शंभुराज देसाई यांनी नेहमीच्या आदराप्रमाणे उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा केला होता, तेव्हा हा क्षण फोटोत कैद झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube