लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

सचिनचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला आणि तिथून पुढे सचिनने महाराष्ट्रालाच नाही तर जगाला उत्तमोत्तम गाणी दिली.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 16T162403.957

बिग बॉस सीजन ६ मधील स्पर्धक सचिन कुमाव फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सीझनच्या पाचव्या आठवड्यात प्रेक्षकांनी भरघोस मतांनी सचिनला सेफ केले, यानंतर सचिन कुमावत खूप भावुक होताना दिसले.
आपल्या अहिराणी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून अहिराणी भाषेचा डंका जगभर पोहचवण्यासाठी आलेल्या सचिन कुमावत यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

अगदी सुरुवातीच्या काळात लग्नात वाजणाऱ्या बँड मुळे सचिनला संगीतात आकर्षण निर्माण झालं. पुढे आपणही यात काम करावं अशी इच्छा सचिनच्या मनात निर्माण झाली, मुलगा लवकर आपल्या पायावर उभा राहील या आशेने सचिनच्या वडिलांनी सुद्धा त्याला संगीताचे क्लास लावले आणि त्यातून सचिनने स्वतःचा बँड उघडला.

२००२ पासून सुरू झालेल्या प्रवासाला अचानक वळण लाभलं ते एका म्युझिक अल्बमच्या निमित्तानं. म्युझिक अल्बम करण्यासाठी त्याला दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आलं, शिवाय त्याच अल्बम मध्ये मुख्य नायकाची भूमिका देखील बजावली. या अल्बमला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, संगीत सोडण्याचा निर्णय घेतलेल्या सचिनचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला आणि तिथून पुढे सचिनने महाराष्ट्रालाच नाही तर जगाला उत्तमोत्तम गाणी दिली.

follow us