‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख घेणार निक्कीची शाळा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख घेणार निक्कीची शाळा

Bigg Boss Marathi New Season : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही, असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Season) नव्या सीझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह (Nikki Tamboli) इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार आहे.

निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला, ‘वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.

रितेश पुढे म्हणाला,”‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार”.

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Bigg Boss Marathi:’बिग बॉस मराठी’च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

“लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया,
साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया,
हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करंलं”, असे या गाण्याचे बोल आहेत. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच…‘भाऊचा धक्का’ या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ ‘भाऊच्या धक्क्यावर’ घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा ‘भाऊचा धक्का’ चांगलाच गाजणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube