Bigg Boss Marathi: ‘आला रे आला… भाऊचा धक्का’; ‘बिग बॉस मराठी’चं नवं गाणं ऐकलंत का?

Bigg Boss Marathi: ‘आला रे आला… भाऊचा धक्का’; ‘बिग बॉस मराठी’चं नवं गाणं ऐकलंत का?

Bigg Boss Marathi New Season Song : टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा आहे. रितेश भाऊची (Ritesh Deshmukh) हटके स्टाईल आणि 16 सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Bigg Boss Marathi New Season) काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ पार (Bhau Cha Dhakka Song) पडणार आहे. या ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच ‘भाऊचा धक्का’ हे गाणं ‘बिग बॉस’प्रेमींच्या भेटीला आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

“लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया,
साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया,
हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करंलं”, असे या गाण्याचे बोल आहेत. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच…

‘भाऊचा धक्का’ या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ ‘भाऊच्या धक्क्यावर’ घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा ‘भाऊचा धक्का’ चांगलाच गाजणार आहे.

Bigg Boss Marathi:  ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

पहिल्याच आठवड्यात मिळणार मोठी शिक्षा

‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात न घडलेली गोष्ट आज घडणार आहे. पहिल्याच आठवड्यात घरातील सदस्यांना एक मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर म्हणत आहेत,”मला धमकी द्यायची नाही”. त्यावर वैभव चव्हाण म्हणतो,”धमकीचा विषयच नाही… मी धमकी दिली तर तुम्हाला काही सुचणारदेखील नाही”. आता नेमकं कोणत्या कारणाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना मोठी शिक्षा मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube