Ritesh Deshmukh : “काका नेहमीच पाठिशी उभे राहिले, काका-पुतण्याचं नातं”… रितेशचं वक्तव्य चर्चेत
Ritesh Deshmukh : राज्याच्या राजकारणात काका आणि पुतण्याच्या जोड्यांची नेहमीच चर्चा होते. त्यांच्यातील वादाचीही चर्चा असते. काही काका पुतण्यांमधील वादही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. आज पुन्हा एकदा या काका-पुतण्याच्या जोडीची चर्चा होत आहे. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाषणात सिनेअभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) काका-पुतण्याच्या नात्याबाबत मोठे विधान केले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उल्हास दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आदी उपस्थित होते.
रितेश देशमुख म्हणाला, की साहेबांना आपल्यातून जाऊन आज 12 वर्षे झाली. त्यांची उणीव नेहमीच भासली. त्यांची उणीव आम्हाला भासू नये यासाठी काका (दिलीपराव देशमुख) नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले. काकांना हे कधी आम्हाला सांगता आलं नाही. पण, आज मी तुम्हा सगळ्यांसमोर सांगतो की काकी मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असावं याचं जिवंत उदाहरण तुम्ही स्टेजवर पाहू शकता.
Ritesh Deshmukh : ‘कंठ दाटला, डोळे भरून आले’.. वडिलांच्या आठवणीने रितेशला रडू कोसळलं
यानंतर वडिलांची आठवण सांगताना रितेश भावूक झाल्याचे दिसले. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. हे दृश्य पाहून येथे उपस्थित असणारे सर्वच जण भावूक झाले होते. मुलगा म्हणून साहेबांनी आम्हाला कधीच रोखलं नाही. कायम सूट दिली. मुलांवर कधीही दबाव टाकू नये. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं. साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. राजकारणात टीका जरूर करा पण व्यक्तिगत टीका करू नका हेच त्यांचे संस्कार होते, असेही रितेश म्हणाला.
अमितभैय्या आता वेळ आली, पावलं उचला
सध्याच्या राजकारणात सध्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. याचं वाईट वाटतं. एकेकाळी दिग्गज नेत्यांनी राज्याचं राजकारण गाजवलं, ते आज दिसत नाही. तो काळ आता परत आणण्याची गरज आहे. अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत, आता वेळ आली आहे. तुम्ही पावलं उचलली पाहिजेत असे सूचक वक्तव्यही रितेश देशमुखने केले.
Riteish Deshmukh: जरांगेंचं आंदोलन अन् मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट चर्चेत