Riteish Deshmukh: जरांगेंचं आंदोलन अन् मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh: जरांगेंचं आंदोलन अन् मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh On Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. तसेच अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट शेअर करत आहेत. नुकतेच अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) मनोज जरांगे यांच्या तब्येतीबद्दल आणि मराठा आरक्षणाबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


रितेश देशमुखनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.” असे ट्विट अभिनेता रितेश देशमुखने यावेळी केले आहे.

रितेश देशमुख आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) तसेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हे कलाकार मराठा आरक्षणाबद्दल सोशल मीडियावर कायम पोस्ट शेअर करत असल्याचे बघायला मिळत आहे. अश्विनीने मनोज जरांगेंची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”एक मराठा लाख मराठा…आणि पाटील साहेबांना काही झाले तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा मग. आता आमच्यावर नुसते लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही”

Kiran Mane: ‘जरांगे पाटलांच्या धैर्याला सलाम’; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट

तर किरण माने यांनी देखील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे, आणि त्यांची प्रकृती सध्या खालावली जात आहे. त्यांच्या शरीरात अशक्तपणा प्रचंड दिसून येत असल्याने उपस्थित असलेल्या शेकडो मराठा बांधवांनी त्यांना किमान पाणी घेण्याची विनंती करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube