Ritesh Deshmukh : ‘कंठ दाटला, डोळे भरून आले’.. वडिलांच्या आठवणीने रितेशला रडू कोसळलं

Ritesh Deshmukh : ‘कंठ दाटला, डोळे भरून आले’.. वडिलांच्या आठवणीने रितेशला रडू कोसळलं

Ritesh Deshmukh : राज्याचे माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर शहरात पार पडले. या कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबियांसह लातुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणीने रितेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हा प्रसंग पाहून भाऊ अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी रितेशला सावरलं. व्यासपीठावरचा हा भावूक क्षण पाहून आई वैशालीताई देशमुख यांच्याही डोळ्यांत पाणी आले.

साहेबांना आपल्यातून जाऊन आज 12 वर्षे झाली. त्यांची उणीव नेहमीच भासली. त्यांची उणीव आम्हाला भासू नये यासाठी काका नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले. काकांना हे कधी आम्हाला सांगता आलं नाही. पण, आज मी तुम्हा सगळ्यांसमोर सांगतो की काकी मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असावं याचं जिवंत उदाहरण तुम्ही स्टेजवर पाहू शकता.

Ved Movie : रितेश-जिनीलियाच्या वेडचा नवा विक्रम; अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद

वडिलांची आठवण सांगताना रितेश भावूक झाल्याचे दिसले. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. हे दृश्य पाहून येथे उपस्थित असणारे सर्वच जण भावूक झाले होते. मुलगा म्हणून साहेबांनी आम्हाला कधीच रोखलं नाही. कायम सूट दिली. मुलांवर कधीही दबाव टाकू नये. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं. साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. राजकारणात टीका जरूर करा पण व्यक्तिगत टीका करू नका हेच त्यांचे संस्कार होते, असेही रितेश म्हणाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube