Ved Movie : रितेश-जिनीलियाच्या वेडचा नवा विक्रम; अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद

Ved Movie : रितेश-जिनीलियाच्या वेडचा नवा विक्रम; अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद

Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. सत्या आणि श्रावणीच्या प्रेमकहानीने बॉक्स ऑफिसवर त्यामुळेच या चित्रपटाने धुमाकुळ घातला. गेल्या अनेक दिवसांनंतर नवं नवे रेकॉर्ड करणारा तो मराठी चित्रपट ठरला. त्यात आता याच रितेश-जिनिलियच्या वेडने आणखी अक नवा विक्रम केला आहे. ज्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. ( Star Pravah Ritesh Deshmukh Jinilia Deshmukh Ved Movie TV Premier Guinness World Record )

बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टिमेटम! घरासमोरच करणार आंदोलन; कारण काय?

वेडचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर…

बॉक्स ऑफिसवर वेड या चित्रपटाने धुमाकुळ घातल्यानंतर, आता ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहिला नाही. त्यांना आता घरबसल्या चित्रपट पाहायला मिळणार आहे. कारण आता वेडचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. स्टार प्रवाह या मराठी मनोरंजन वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 20 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता हा चित्रपट टिव्हीवर पाहायाला मिळणार आहे.

मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, दीड तासांच्या भाषणात फक्त…

वेडच्या अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद…

वेड चित्रपटामध्ये छत्रीसोबत सत्या आणि श्रावणीच्या प्रेमकहानीचं वेगळं नात आहे. त्याचं छत्रीच्या आधारे या चित्रपटाने नवं रेकॉर्ड केलं आहे. या टिव्ही प्रीमियरसाठी नेहमीच मराठी परंपरा जपणाऱ्या स्टार प्रवाह या वाहिनीने महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. 20 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता वेडचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

त्यानिमित्त स्टार प्रवाहने अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत सत्या आणि श्रावणीच्या प्रेमकहानीची साक्ष देणाऱ्या छत्रीच्या सहाय्याने एक भव्य दिव्य ह्रदयाची कलाकृती साकारण्यात आली. यासाठी तब्बल 1446 छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमातून ह्रदयाची कलाकृती साकारण्यात आली. मराठी चित्रपटासाठी इतिहासात पहिल्यांदाच असा करण्यात आलं. त्यामुले गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली. यावेळी रितेशने या ह्रदयाची कलाकृतीला शेवटची छत्री जोडत विक्रम पूर्ण केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube