मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, दीड तासांच्या भाषणात फक्त…

मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, दीड तासांच्या भाषणात फक्त…

Supriya Sule reaction on PM Modi’s Speech : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काँग्रेसवर तुटून पडले. त्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएम मोदी यांच्यावर टीका केली आहे.

सुळे एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यांचे भाषण आम्हाला ऐकायचं होतं. ते महागाईवर बोलतील, अर्थव्यवस्थेवर बोलतील, बेरोजगारीवर बोलतील नाहीतर मणिपूरवर तरी बोलतील अशी आमची इच्छा होती. पण त्यांच्या दीड तासांच्या भाषणात 90 टक्के फक्त ‘इंडिया’वर चर्चा केली, अशी टीका सुळे यांनी केली.

मोदी काय म्हणाले होते ?

मोदींनी भाषणाच्या सुरूवातीलच शरद पवारांवरून अधीर रंजन चौधरी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आज देश विरोधी पक्षाकडे पाहत आहे आणि तुमचे शब्द ऐकतो आहे. मात्र प्रत्येक वेळी काँग्रेसने देशाला निराशेशिवाय काहीही दिलं नाही. विरोधी पक्षाचं जे धोरण आहे, त्यावर मी सांगेन की, ज्याचं वही खात्याचा काही ताळमेळ नाही, ते आज आम्हाला हिशोब मागत आहेत.या अविश्वास प्रस्तावादरम्यान अशा गोष्टी घडल्या ज्या कधी ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत आणि कधी कल्पनाही केल्या नाहीत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव बोलणाऱ्यांच्या यादीत नव्हते.

सभागृहात बोलण्यास सुरूवात करताना मोदींनी विरोधकांन 2018 सालीदेखील सांगितलं होतं, तुम्ही 2023 साली पूर्ण तयारी करुन या, पण विरोधक पूर्ण तयारी करुन येत नाहीत. त्यामुळे सभागृहात फिल्डिंग विरोधकांची होती पण बॅटिंग सत्ताधारीचं करत होते. सत्ताधारी विरोधकांच्या ‘नो बॉलवर चौकार, षटकार’ मारत होते, पण विरोधक ‘नो’ बॉलच टाकत होते असा मिश्लिल टोला देखील मोदींनी लगावला.

शरद पवारांची आठवण काढत मोदींनी उडवली अधीर रंजन चौधरींची खिल्ली

पुढे बोलताना मोदींनी विरोधकांकडून HAL आणि LIC कंपन्यांवरून करण्यात येणाऱ्या टीकेलाही सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, जगात आपल्या संरक्षणासाठी हेलिकॉप्टर बनवणारी सरकारी कंपनी HAL ची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांकडून संबंधित कंपनीच्या कामगारांना भडकवले जात आहे. मात्र, यानंतरही HAL एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे.

एलआयसीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, गरीबांचा कष्टाचा पैसा सत्ताधाऱ्यांनी उधळून लावला अशी टीका करण्यात आली होती. पण आज हीच कंपनी एका मजबूत स्थितीत आहे. विरोधकांची सरकारी कंपनीवरील ही टीका सरकारी कंपनीवर शेअर मार्केटमध्ये रूची असणाऱ्यांसाठी गुरूमंत्र अस्ल्याचे मोदी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube