Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

Bigg Boss Marathi New Season Day 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरात इतिहासात जे घडलं नाही ते घडताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi New Season) फॉरेनर, युक्रेनची मुलगी इरिना रूडाकोवा (Irina Rudakova) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आंतरराष्ट्रीय स्टाईलने कल्ला करताना दिसत आहे. (BB Marathi) आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिना मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.’बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता वालावलकर इरिनाला तिची भाषा शिकवताना दिसत आहे. अंकिता इरिनाला शिकवतेय,”माका सांगू नको”. त्यानंतर इरिनादेखील “माका सांगू नको” म्हणताना दिसत आहे. त्यानंतर इरिना म्हणते,”राम कृष्ण हरी”. इरिनाच्या मराठी शिकण्याच्या धडपडीवर घरातील इतर सदस्य तिचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यानंतर वैभव चव्हाणला ती “तुम्ही कसे आहात हे विचारते”. त्यावर वैभव म्हणतो,”मी एकदम मस्त”.

https://www.youtube.com/watch?v=wxSI5D9EsM8

इरिना सूरजला म्हणाली, “बकरी”

आजच्या भागात गोलीगत सूरज चव्हाण इरिनाला डान्स करायलादेखील लावतो. त्यानंतर इरिना सूरजसारखा डान्स करताना दिसेल. पुढे इरिना सूरजला ‘बकरी’ म्हणते. त्यावर सूरज तिला “मी शेर आहे” असं म्हणतो. त्यावर इरिना त्याला “मी किंग कोब्रा आहे” असं म्हणते. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube