Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन

Bigg Boss Marathi New Season Day 4 : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. (Bigg Boss Marathi Season 5) प्रीमियरपासूनच ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या (Bigg Boss) पसंतीस उतरत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील आऊट झाला आहे. ‘नॉमिनेशनची तोफ’ असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ने ‘नॉमिनेशन तोफ’ या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

Bigg Boss Marathi च्या घरात पळणार सदस्यांच्या तोंडचं पाणी, पाहा काय घडलं?

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube