Waynad Landslide : वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला; 205 निष्पाप जीवांचा बळी

Waynad Landslide : वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला; 205 निष्पाप जीवांचा बळी

Waynad Landslide : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन दुर्घटनेतील (Waynand Landslide) मृतांच्या आकड्यात वाढ झाल्याची माहिती समोर आलीयं. या दुर्घटनेत मृतांची संख्या आत्तापर्यंत 205 वर पोहोचलीयं. या भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत. सध्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कराकडून मदतकार्य सुरु असून एनडीआरएफसह अनेक पथकं बचाव कार्य करत आहेत. वायनाड भूस्खलनामध्ये सुरुवातीला 143 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. आता मृतांचा आकडा वाढला असून जवळपास 205 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

भूस्खलनानंतर मलप्पुरमच्या पोथुकल्लू परिसरात काही लोकांचे मृतदेह सापडले आहेत, हे मृतदेह चालियार नदीत वाहून गेले होते. बचाव पथकानं दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही आणखी लोक अडकल्याची शक्यता आहे. नागरी संरक्षण, पोलीस, अग्निशमन विभाग, एनडीआरएफचे सुमारे 250 कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तसेच, लष्कराच्या 122 इन्फंट्रीचे सुमारे 225 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. भारतीय हवाई दलाने कोईम्बतूरमधील सुलूर एअरबेसवरून 2 हेलिकॉप्टर पाठवले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ कारणाने कोकण हार्टेड गर्ल अंकिता ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची

भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसानंतर जिल्हा रुग्णालयात रडणारे लोक जमिनीवर पडलेल्या मृतदेहांच्या रांगेत आपल्या नातेवाईकांना शोधत होते. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह पाहून काहींना धक्का बसला, तर ज्यांचे नातेवाईक जखमी झाले त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एका स्थानिक अंगणवाडी सेविकेने सांगितलं की, ती चार जणांच्या कुटुंबाचा शोध घेत आहे, ज्यात एका 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे जिला ती बऱ्याच काळापासून ओळखत होती. सकाळी त्याच्या काही नातेवाईकांनी मला फोन केला आणि संपूर्ण कुटुंब बेपत्ता असल्याचं सांगितले. दुर्दैवाने, मला अद्याप त्यापैकी काहीही सापडले नाही असं ती म्हणाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube