विदर्भाने 7 वर्षांनंतर जिंकली रणजी ट्रॉफी, अंतिम सामन्यात केरळचा पराभव

विदर्भाने 7 वर्षांनंतर जिंकली रणजी ट्रॉफी, अंतिम सामन्यात केरळचा पराभव

Vidarbha Won Ranji Trophy Defeating Kerala : विदर्भाने तब्बल 7 वर्षांनंतर रणजी करंडक (Ranji Trophy) विजेतेपद जिंकलंय. अंतिम सामन्यात केरळचा पराभव केला. नागपूरमध्ये केरळ (Kerala) आणि विदर्भ (Vidarbha) यांच्यात खेळला गेलेला हा सामना पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (Vidarbha won Ranji Trophy) अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विदर्भाने केरळविरुद्ध विजय मिळवला.

VIDEO : गेल्या 10 वर्षांपासून फडणवीसच गृहमंत्री, अत्याचार अन् गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरेंचा संताप

रणजी ट्रॉफी 2024-25 चा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात नागपूर येथील विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. दोन्ही संघांमध्ये खेळलेला सामना ड्रॉ राहिला. परंतु, पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विदर्भाला विजेता घोषित करण्यात (Cricket News) आलंय. 2018-19 नंतर विदर्भाने पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकलाय. त्यानंतर विदर्भाने सलग दोन वेळेस रणजी ट्रॉफी जिंकली होती. गेल्या वर्षीही विदर्भ संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला होता, परंतु तेव्हा मुंबईकडून विदर्भाचा पराभव झाला.

विदर्भाच्या या विजयाचा नायक करुण नायर होता. त्याने पहिल्या डावात 86 आणि दुसऱ्या डावात 135 धावा केल्या. त्याच्याशिवाय, दानिश मालेवारनेही पहिल्या डावात 153 धावा करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. विदर्भाने पहिल्या डावात 379 धावा केल्या होत्या. तर केरळचा संघ 342 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे, विदर्भाने पहिल्या डावात 37 धावांची आघाडी मिळवली होती.

संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी; मनसेच्या पुस्तक प्रदर्शनातील हजेरी राष्ट्रवादीला खटकली

विदर्भाने अक्षय वाडकरच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी उंचावलीय. रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये विदर्भ विरुद्ध केरळ हे संघ आमनेसामने होते. करुण नायरच्या शानदार बॅटिंगच्या जोरावर विदर्भाने घरच्या मैदानात केरळवर एकतर्फी विजय मिळवला आहे. दोन्ही संघातील सामना हा अनिर्णित राहिला. विदर्भाची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. विदर्भाने याअगोदर 2017-2018 आणि 2018-2019 साली रणजी ट्रॉफीचा किताब जिंकला होता. त्यानंतर आता 4 वर्षांनंतर विदर्भाने ट्रॉफीवर नाव कोरलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube