VIDEO : गेल्या 10 वर्षांपासून फडणवीसच गृहमंत्री, अत्याचार अन् गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरेंचा संताप

VIDEO : गेल्या 10 वर्षांपासून फडणवीसच गृहमंत्री, अत्याचार अन् गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray Criticized Devendra Fadanvis : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मविआ नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. सोमवारपासून महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद देखील झालीय.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलंय. सोबतच गुन्हेगारीचा आलेख देखील उंचावतोय. यावरून महाविकास आघाडीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा (MVA Politics) साधलाय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची देखील छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय. त्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी गृहमंत्र्यांना घेरलंय. पोलिसांनी अजून एकालाही ताब्यात घेतलेलं नाहीये, यावर आदित्य ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच मागील दहा वर्षांपासून राज्याचे गृहमंत्री आहेत.

कृषिमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तत्परता कधी दाखवणार?, दानवेंचा महायुती सरकारला सवाल

भाजपच्या सरपंचालाच न्याय मिळत नाही. त्याचा खून होतोय. खुन्याच्या आकाच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता फडणवीस सरकारला लगावला (Maharashtra Politics) आहे. सत्ताधारी पक्ष निवडून आल्यानंतर आता वचनपूर्ती करणार का, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी महायुतीतील अंतर्गत वादावर भाष्य केलंय. सोबतच सत्ताधारी पक्षाला माज आलाय, अशा तिखट शब्दांत हल्लाबोल केलाय.

संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी; मनसेच्या पुस्तक प्रदर्शनातील हजेरी राष्ट्रवादीला खटकली

पत्रकार परिषदेदरम्यान आदित्य ठाकरेंनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक चॅलेंज दिलंय. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सुसंवाद विरोधकांसोबत साधायचा म्हणत आहेत. परंतु, उघड भ्रष्टाचार होत आहेत, त्याची नावे जाहीर करा. बांग्लादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे. असं असताना त्या देशाला भारतामध्येच खेळायला बोलवलं जातं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube