Aditya Thackeray: भाजप, शिंदे, ‘मनसे’ एकवटले… वरळीत आदित्य ठाकरे पडणार?

Aditya Thackeray: भाजप, शिंदे, ‘मनसे’ एकवटले… वरळीत आदित्य ठाकरे पडणार?

Aditya Thackeray will fall in Worli: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) विधानसभेला पडणार? आदित्य ठाकरे निवडणूक हरणार? लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून (Lok Sabha Election) मुंबईच्या राजकीय वर्तुळात याच प्रश्नाची जोरदार चर्चा आहे. महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी इथून घेतलेली लक्षणीय मते, मनसेने (MNS) लावलेली फिल्डिंग आणि भाजपचा आशीर्वाद अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याने इथून आदित्य ठाकरे पडणार असे बोलले जाऊ लागले आहे. पण खरंच आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक हरु शकतात का? पाहुयात…

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक हरु शकतात ही चर्चाच सुरु झाली चार जूनपासून. वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. इथून लोकसभेला शिवसेनेकडून यामिनी जाधव मैदानात होत्या, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक लढवत होते. चार जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर अरविंद सावंत निवडून आले. पण आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून सावंत यांना अवघे सहा हजारांचे मताधिक्य मिळाले. तिथूनच चर्चांना सुरुवात झाली की भाजप, शिवसेना आणि मनसेने थोडा जोर लावला तर आदित्य ठाकरे पराभूत होऊ शकतात.

खरंतर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. दत्ताजी नलावडे यांनी याच मतदारसंघाचे चारवेळा प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये इथून सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर विजय मिळवला. 2014 मात्र मतदारसंघ पुन्हा सेनेकडे आला. सुनील शिंदे इथून आमदार झाले. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांना आमदार करण्याचे ठरले. त्यावेळी मतदारसंघाचा शोध मराठीबहुल वरळीपर्यंत येऊन थांबला. पण ठाकरेंना आमदार करण्यासाठी शिवसेनेला इथे बरीच कसरत करावी लागली होती.

Aditya Thackeray : मोठी बातमी ! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी

सचिन अहिर यांचा धोका ओळखून त्यांना शिवसेनेत घेण्यात आले. विधान परिषद दिली. तिथले शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनाही विधान परिषद दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दिला. त्यामुळे यापूर्वी तिथून निवडणूक लढविलेल्या संदीप देशपांडे यांचाही धोका टळला गेला. राष्ट्रवादीनेही अगदीच नावाला उमेदवार दिला. या सगळ्या घडामोडींनंतर आदित्य ठाकरे विजयी झाले. पण यंदा समीकरणे बदलली आहेत.

अरविंद सावंत यांचे घटलेले मताधिक्य बघून भाजप, शिंदेसेना आणि मनसे यांना संधी दिसू लागली आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे मनसे दुखावली गेली. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवले. आम्ही विधानसभेला आदित्य ठाकरे यांनाही पाठिंबा दिला होता. पण गेल्या चार-साडेचार वर्षांत त्यांनी काम केलेले नाही. कोव्हिड काळातही त्यांनी काहीच काम केले नाही. तुम्ही लोकांशी चर्चा केली तर त्यांच्याकडूनही तुम्हाला हेच पाहायला मिळेल. अशा अपेक्षेने आम्ही त्यांना पाठींबा दिला नव्हता, अशी खंत बोलून दाखवली.

 

अमित ठाकरेंच्या टीकेची चर्चा सुरु असतानाच मनसेने इथून फिल्डिंग लावायला सुरुवात केली. बर्फातील प्राणी बर्फात पाठवूया. जनमानातील आमदार ‘संदीप’ वरळीत आणू, अशा आशयाचे बॅनर्स झळकू लागले. अमित ठाकरे यांनी वरळीत बैठका आणि गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि भाजपही मागे नाही. येत्या काळात आदित्य ठाकरेंनी वरळीऐवजी मुस्लिम बहुल भेंडी बाजारमधून निवडणूक लढवावी असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

महायुतीने ठरवूनही आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले असावे अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत मुंबईतच अडकवून ठेवायचे असेल तर त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे सॉफ्ट टार्गेट ठरु शकतात. याचमुळे आदित्य ठाकरे शिवडी विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरु झाली आहे.

तुम्हाला काय वाटते?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज