MNS News : ‘हिंमत असेल तर मराठी माणसाला पंतप्रधान करा’; मनसेचा भाजपला थेट चॅलेंज!

MNS News : ‘हिंमत असेल तर मराठी माणसाला पंतप्रधान करा’; मनसेचा भाजपला थेट चॅलेंज!

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव (MNS News) कार्यक्रमात यंदा प्रसिद्ध हिंदी पटकथा व संवाद लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांना आमंत्रित करण्यात आले होते. मनसेच्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपने यावर खोचक टीका केली होती. भाजपाच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत हिंमत असेल तर गुजरातीऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करून दाखवा असे आव्हान दिले. दोन्ही पक्षांच्या या आरोप प्रत्यारोपांवरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटू लागले आहेत.

मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात यंदा पटकथा व संवाद लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत असून त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांन जोरदार टीका केली.

काल एका दीपोत्सवात सलीम-जावेद यांना घेऊन काहींनी आपली टिमकी वाजवून घेतली. सलीम-जावेद मोठे आहेतच पण, मराठी कलाकारही छोटे नाहीत. त्यांच्या उपस्थितीत हा दीपोत्सव झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, अशी टीका शेलार यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही जोरदार टीका केली. आमच्या मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठी प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. हिंमत असेल तर त्यांनी गुजरातीऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करावं. मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेव्हा त्यांच्या पाठिशी कोण उभं राहतं आणि कोण पाठीला पाय लावून पळतं हे महाराष्ट्राला माहिती आहे, असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला.

Javed Akhtar : ‘मी नास्तिक पण राम अन् सीता..; जावेद अख्तर यांचं विधान

मी नास्तिक पण राम अन् सीता यांना मानतो – जावेद अख्तर 

या कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणाले होते, की  नास्तिक आहे पण राम आणि सीता यांना खूप मानतो, माझ्यासारखे जे नास्तिक ते सुद्धा मानतात. काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत, काही लोक आश्चर्यचकित झाले असतील की, राज ठाकरे यांना बोलवायला अजून कोणी दुसरा सापडला नाही का? याची दोन कारणे आहेत. एकतर आमची चांगली मैत्री आहे आणि दुसरी गोष्ट ही की, मी राम आणि सीता यांना मानतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी कमी झालं आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम यांची गोष्ट करतो, तेव्हा ते राम आणि सीता हेच आहेत. रामायणामध्ये राम आणि त्यांचे भावंड हे नातं सुद्धा अद्भुत आहे. रामाला जो वेगळं करेल तो रावण आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube